आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाख १४ हजारांचा गुटखा जप्त, इंडिकासह आरोपीला घेतले ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- अमरावतीवरून मूर्तिजापूर शहरात येणारा दोन लाख ३४ हजारांचा गुटखा इंडिकासह कोकणवाडी रोडवरून जप्त केला. ही कारवाई २२ सप्टेंबरच्या पहाटे पाच वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी नंदकुमार काळे यांच्या पथकाने केली. पोलिसांनी आरोपीसही अटक केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी नंदकुमार काळे त्यांच्या पथकातील एएसआय युरूस शेख, इरफान शेख, संदीप गुंजाळ, चालक थोरात हे पेट्राेलिंग करत होते. दरम्यान, २२ सप्टेंबरच्या पहाटे पाच वाजता अमरावतीवरून मूर्तिजापूरकडे इंडिका क्र. एमएच २३ ८४७९ मध्ये गुटखा येत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सापळा रचून कोकणवाडी रोडवर गितेश गणेश गुप्ता वय २८ वर्ष रा. जुनी वस्ती मूर्तिजापूर याच्या इंडिका गाडीची तपासणी केली असता गाडीत एक लाख १४ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. शहरात परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा पुडीचा माल विक्रीस येत आहे. यापूर्वीही मोठ्या प्रमाणात गुटखा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर पकडला होता.

उपविभागीय पोलिस अधिकारी काळे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत लाख १४ हजारांचा मुद्देमाल दीड लाख रुपये किमतीची कार असा एकूण लाख ३४ हजारांचा माल जप्त करण्यात आला.
अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शीतल गजानन घाटोळ यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या वेळी पोलिस उपनिरीक्षक दिलीप घाेटकर यांचीही उपस्थिती होती. आरोपीस अटक केली असून, पुढील तपास मूर्तिजापूर पोलिस करत आहेत.

यापूर्वीही पकडण्यात आला होता गुटखा
मूर्तिजापूरशहरामध्ये परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा पुडीचा माल विक्रीस येत आहे. यापूर्वीही मोठ्या प्रमाणात गुटखा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर पकडला होता.
मूर्तिजापूर येथे इंडिकासह लाख ३४ हजारांचा गुटखा जप्त केला.