आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेल्यात 14 कोटींची घातक कीटकनाशके; मृत्यूंची एसआयटीमार्फत चाैकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- घातक कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी,शेतमजुरांचे वाढते मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून कृषी विभागाने केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील विक्रेते गाेदामांमध्ये १४ काेटी ३२ लाख रुपये किंमतीचा २८४.३१ मेट्रिक टन घातक कीटकनाशकांचा साठा अाढळून अाला अाहे. त्यामुळे या कीटकनाशकांची एक महिना विक्री करु नये, असा अादेश कृषी विभागाने बजावला अाहे. एका ठिकाणी तर नाेंदणी नसलेली कीटकनाशके अाढळून अाली असून, या कारवाईमुळे खळबळ उडाली अाहे. 

गत वर्षी अाॅगस्ट महिन्यात विना परवाना पीक वाढ संजीवकांची उत्पादन करुन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला हाेता. या छाप्यात सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात अाला हाेता. यापूर्वी मूर्तिजापूर येथे तर बाेगस खतांचा कारखानाच सुरु असल्याचा प्रकार उजेडात अाला हाेता. दरम्यान, गत काही दिवसांपासून कृषी विभागाच्या भरारी पथकांनी गाेदामांची तपासणी सुरु केली. अखेर मंगळवारी पहिल्या टप्यातील सर्व पथकांची माहिती संकलित करण्यात अाली अाहे. यापुढेही तपासणी मोहीम सुरुच राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. 

भरारी पथकांमध्ये यांचा होता समावेश
भरारी पथकामध्ये कृषी उपसंचालक ए.जी.वाघमारे, जे. अार. टेकाळे, वी.सी. माेरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जिकृवि अधिकारी हनुमंत ममदे, अरूण गावंडे, ए.डी.कुळकर्णी, व्ही. अार.घुले, डाॅ. जुमडे,तालुका कृषी अधिकारी एन.एन. शास्त्री यांचा समावेश हाेता. 

अशी अाहेत विक्रेता, उत्पादक कंपनींची नावे 
कृषी विभागाने १४ कंपनी (गाेदाम), विक्रेत्यांकडे अाढळून अालेल्या कीटकनाशकाला विक्री बंदचा अादेश दिला अाहे. यामध्ये परिजात इंडस्ट्रीज लि. (कीटकनाशक ९५३ मेट्रिक टन, किमत ३९.५९८ लाख ), कृषी रसायन एक्सपाेर्ट (६०० मेट्रिक टन, किमत १७.८५ लाख), क्रिस्टल क्राॅप प्राेटेक्शन प्रा.लि. अाझादपूर (दिल्ली- मेट्रिक टन ३७०, किंमत ५.२०० लाख), घरडा केमिकल्स लि. सांबा (जम्मू काश्मिर-११० मेट्रिक टन, किंमत १३.९४० लाख ), मे. फायटाेकेम इंडिया लि. मेडक (अांध्र प्रदेश मेट्रिक टन- ५३२६४, किंमत ३३६.३५० लाख), मे. जयलक्ष्मी इंडस्ट्रीज (गुजरात- ३९४५८.७५, किंमत १४८.५६० लाख), कृषि रसायन एक्सपर्ट (मेट्रिक टन-३४१०, किंमत १५९.५९ लाख), सिजेंटा इंडिया लि. (मेट्रिक टन-११९३७, किंमत ३७५.३६ लाख), एफएमसी इंडिया. प्रा. लि. (मेट्रिकन टन- ७१३०, किंमत ४९.४८ लाख), शिवालिक क्राॅपसायन्सेस (मेट्रिक टन- ५४, किंमत ६.१६ लाख) अाणि सल्फर मिल्स लि.कडे १९.३४ लाखाचा ३५४२.७५ मेट्रिक टन किटकशाकाचा साठा अाढळून अाला. तसेच गुजरात इन्सेक्टीसाईड, बायर इंडिया लि. बायाेस्टॅड यांच्याकडे एकूण १६४.०२ मेट्रीक टन कीटनाशकचा साठा अाढळून अाला असून, याची किंमत २४८.६८ लाख अाहे. 

विक्री बंद आदेश 
विक्रीबंदकेलेली कीटकनाशके जीवितास घातक अाहेत. त्यामुळे तुर्तास एक महिना िवक्रीला बंदी घातली अाहे. पुढील अादेशानुसार निर्णय घेण्यात येईल. 
- मिलिंद जंजाळ, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अकाेला. 

काय अाढळले तपासणीत 
- कीटकनाशकिजवितास हानीकारक हाेते. 
- कीटकनाशकाचा परवान्यात समावेश नव्हता. 
- साठा अद्ययावत नव्हता. कर्मचारी प्रशिक्षित नव्हते. 
- कीटकनाशकाचे उगमप्रमाणात नाव नव्हते. 
- साठा पुस्तक अपूर्ण होते. इनव्हाईसही दाखवण्यात अाले नाही. 
- विना नाेंदणीकृत कीटकनाशकांचा साठा अाढळून अाला. 
बातम्या आणखी आहेत...