आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष देऊन पळवले, आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सेंट्रींगचे काम करणारा युवक, जेथे काम करत होता, त्या घरमालकाच्या शेजारी पाहुणी म्हणून आलेली १४ वर्षाची मुलगी या दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. युवकाने तिला लग्नाचे आमिष देऊन जानेवारीला पळवून नेले होते. मुलीच्या आत्याच्या तक्रारीवरून खदान पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला होता. 
 
महिनाभरानंतर पोलिस मागावर असल्याची खात्री युवकाला झाल्यानंतर त्याने मुलीला अकोल्यात आणून सोडले पुन्हा तो पळून गेला होता. १५ दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर खदान पोलिसांनी त्याला मंगळवारी नागपूरहून अटक केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्कार लहान मुलांचे लैंगिक शोषण कायद्यानुसार गुन्ह्याच्या कलमात वाढ केली आहे. 
 
अजय उर्फ मायकल किशोर मेश्राम वय २५ रा. तानाजी चौक खदान याने मुलीला लग्नाचे आमिष देऊन पळवून नेले. सुरुवातीला तो शेगाव, मध्यप्रदेशातील रिवा नंतर वर्धा येथे या मुलीला घेऊन गेले. तेथे पती-पत्नीसारखा राहिला. आपल्याविरोधात पोलिस तक्रार दिल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर त्याने २५ फेब्रुवारीला रात्री मुलीला सिटी कोतवाली पोलिस ठाण्यासमोर सोडून दिले होते. 
 
या प्रकरणी बालकल्याण समितीने मुलीने बयाण नोंदवून प्रकरण पोलिसात दिले होते. खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक असलम खान यांचे पथक आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांनी अखेर आरोपीचे मोबाइल लोकेशन आणि त्यांना प्राप्त होत गेलेल्या माहितीनुसार त्यांनी आरोपीवर पाळत ठेवत मोठ्या शिताफिने आरोपीला नागपूर येथून मंगळवारी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. जे. भारसाकळे करत आहेत. 
 
आरोपीने दिली होती युवतीला आत्महत्येची धमकी 
आरोपी युवकाने मुलीला पळवून जावून लग्न करु, असे पटवून सांगितले. सुरुवातीला मुलीने नकार दिला. तू जर आली नाही तर मी माझ्या जीवाचे काहीही करीन असे तिला भावनिक ब्लॅकमेल केले. त्यानंतर तो तिला जानेवारीच्या रात्री एमएच ३० एजी ४९३० क्रमांकाच्या दुचाकीवरून शेगावला घेऊन गेला. तेथे तो वैभव गेस्टहाऊसमध्ये दोन दिवस राहिला. त्यानंतर तो मध्यप्रदेशातील रिवा येथे, त्यानंतर वर्धा येथे भाड्याने खोली घेऊन राहू लागला. ही मुलगी तिच्या आत्याकडे पळून जाण्याच्या एक महिना आधी पाहुणी म्हणून आली होती. 
बातम्या आणखी आहेत...