आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४ वर्षीय जैदने बनवली इंजिनवर चालणारी वेगवान सायकल,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - कुठलेही मार्गदर्शन पाठीशी अनुभव नसलेल्या १४ वर्षीय जैदने आपल्या कल्पक बुध्दीमत्तेच्या जोरावर इंजिनवर चालणारी सायकल बनवली आहे. या सायकलला त्याने फवारणी पंपाचे इंजिन लुनाची क्लच प्लेट बसविली आहे. तसेच या सायकलला त्याने समोर लहान व्हील तर मागे मोठे व्हील बसविले आहे. त्यामुळे सायकलला वेग येते. ही सायकल एका लीटर पेट्रोलमध्ये १२० किलोमीटर अॅव्हरेज देत असल्याचा दावा चिमुकल्याने केला आहे. येथील उर्दू शाळेत इयत्ता नववीत शिकणारा शेख जैद जलीस अजहर यास शाळेत जाण्यासाठी त्याच्या वडिलांनी गिअरची सायकल खरेदी करून दिली होती. या सायकलच्या गिअरचा अभ्यास केला असता लहान आणी मोठ्या व्हिलचा वेग त्याचा लक्षात आला. त्यानंतर त्याने इलेक्ट्रिक सायकल बनविण्याचा प्रयत्न केला. परंतु बॅटरी मोठी चार्जिगंचा प्रश्न असल्यामुळे त्याने ही सायकल इंजिनवर बनवण्याचा विचार केला. त्यानंतर त्याने एक जुनी सायकल विकत घेतली.
या सायकलला त्याने फवारणी पंपाचे इंजिन लुनाची क्लच प्लेट बसविली. दोन चाके समान राहिल्यास इंजिनवर दबाव येवून अॅव्हरेज कमी येणार. शिवाय पेट्रोलही जास्त लागणार आहे. यासाठी त्याने सायकलचे समोरील मोठे तर मागील लहान चाक बसविले. तर सायकलला गती येण्यासाठी त्याने समोर लहान मागे मोठे व्हील बसविले. त्यानंतर त्याने सायकल चालवून पाहिली असता, सायकलला गती येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने सायकलच्या मागील सीटवर इंजीन, लुनाची क्लच प्लेट, ब्रेक आदी वेल्डरच्या साह्याने बसवून घेतले. ही सायकल एका लीटर पेट्रोलमध्ये १२० किलाेमीटर अॅव्हरेज देत असल्याचा दावा त्याने केला आहे. भविष्यात मॅकेनिकल इंजिनिअर होऊन जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचा त्याने मनोदय व्यक्त केला आहे. यासाठी त्याने कोणाचीही मदत घेतली नाही, हे विशेष.
एक लीटर पेट्रोलमध्ये १२० किलोमीटर धावत असल्याचा केला दावा

प्रोजेक्टरला मिळाला होता प्रथम क्रमांक
मागील वर्षी शाहू इंजिनिअर कॉलेजमध्ये झालेल्या प्रदर्शनीमध्ये जैद याने वाहतूक नियंत्रित करण्यासाठी रोप वेचा आगळावेगळा प्रोजेक्ट सादर केला होता. त्याच्या या प्रोजेक्टला एक हजार रुपयाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.
बातम्या आणखी आहेत...