आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४० गाव पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - परंतु, मागील चार वर्षांपासून या योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने या तीनही तालुक्यातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. अनेक नागरिक गळती लागलेल्या व्हॉल्वमधीलमधील पाणी कॅनमध्ये भरून आपली तहान भागवत आहेत, तर काही नागरिकांना नाईलाजास्तव क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे.

अनेक वर्षांपासून शेगाव, जळगाव जामोद संग्रामपूर हे तीन तालुके क्षारयुक्त पाण्याने ग्रासले आहेत. यापैकी जळगाव जामोद संग्रामपूर या दोन तालुक्यांमध्ये बहुसंख्येने आदिवासींचे वास्तव्य आहे. शेगाव वगळता जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात सर्वत्र क्षारयुक्त पाणी असल्याने शेतक-यांना खरिपाच्या पिकावरच समाधान लागावे लागत आहे. आजपर्यंत या तीनही तालुक्यातील नागरिकांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे आतापर्यंत या तीनही तालुक्यातील ११८ जणांचा किडनी पोटाच्या आजाराने मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी शासकीय असली तरी प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी मोठा असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे किडनीचे विकार दूर व्हावेत, यासाठी शासनाने वान प्रकल्पावरून १४० गाव पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. चार वर्षांपासून या योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, अद्यापही या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना भर पावसाळयात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्य:स्थितीतही जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांना क्षारयुक्त पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत आहे. या योजनेची वाण प्रकल्पावरून शेगावपर्यंत जलवाहिनी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शेगाव जळगाव जामोद या तालुक्यांमधून जिल्ह्यात सर्वात मोठी असलेली पूर्णा नदी वाहत आहे. असे असतानाही या परिसरात क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण अधिक आहे.

"आरओ'ची मागणी वाढली
शेगाव,जळगाव जामोद संग्रामपूर हे तीनही तालुके खारपाणपट्ट्या येत असल्यामुळे या भागात सर्वत्र क्षारयुक्त पाणी असते. हे पाणी पिल्याने अनेक नागरिकांना किडनी पोटाचे आजार झाले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक स्वच्छ पाण्यासाठी आपल्या घरात "आरओ' सिस्टीम लावत आहेत.

तातडीने हालचाली करण्याची व्यक्त होतेय अपेक्षा
१४०गाव पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना शक्य होईल त्या ठिकाणावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे लोकप्रतनििधी प्रशासनाने यासंदर्भात दखल घ्यावी, तसेच संबंधित यंत्रणेला योजना पूर्णत्वास नेण्यासाठी तातडीने हालचाली करण्याच्या सूचना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लिकेज व्हॉल्व्हचा नागरिकांना आधार
१४० गाव पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. अशातच गावातील विहिरीला क्षारयुक्त पाणी आहे. त्यामुळे अनेक नागरिक गळती लागलेल्या व्हॉल्वमधून कॅनमध्ये पाणी भरून आपली गरज भागवत आहेत. सकाळपासूनच अनेक ठिकाणी अशा व्हॉल्ववर पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. जलवाहनिी फुटलेल्या ठिकाणी तसेच गळती लागलेल्या व्हॉल्व्हच्या ठिकाणी गढूळ पाणी साचत आहे. अशाही स्थितीत नागरिक मात्र पर्याय नसल्याने तेथून पाणी भरून नेत आहेत. हे पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडत आहेत. त्यामुळे जलवाहिनी आणि व्हॉल्वद्वारे नेले जाणारे पाणीही त्यांच्या जीवावर उठत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे योजना पूर्णत्वास जाण्यासाठी जलदतेने काम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

योजना पूर्ण करण्याची अपेक्षा
शेगाव,जळगाव जामोद संग्रामपूर या तालुक्यातील नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. यासाठी लोकप्रतिनीधी अधिका-यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...