आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाभरामध्ये रब्बी पीक पेऱ्यात १५ हजार हेक्टर वाढ, गहू-हरभरा पिकांना दिले प्राधान्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - यंदा परतीच्या पावसाने तब्बल दहा ते बारा दिवस जिल्ह्याच्या सर्वदुर भागात हजेरी लावली होती. त्यामुळे सिंचन करणारे प्रकल्प ओव्हर फ्लो होवून विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुबलक पाणी असल्यामुळे यंदा जिल्ह्यात पंधरा हजार हेक्टर रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. दरम्यान आज डिसेंबर पर्यत तब्बल लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे. तर अजूनही शेतकरी पेरणी करणार असल्यामुळे पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे.
एक महिना उशिरा सुरू झालेल्या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. परंतु ही पेरणी होत नाही, ताेच पावसाने विस ते बावीस दिवसाची दडी मारली होती. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागते काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता. परंतु उशिरा का होईना पावसाने सुरुवात करून दिली. त्यामुळे शेत शिवार चांगलेच बहरले होते. परंतु सोयाबीन, मूग उडदाचे पीक काढणीवर येत नाही, तोच परतीच्या पावसाने हजेरी लावली. तब्बल दहा ते बारा दिवस पाऊस पडल्यामुळे उडीद सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसामुळे काळे पडले होते. तर कापसावर लाल्याने आक्रमण केलेे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. अशा विविध संकटाचा सामना करीत शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीची तयारी केली होती. तर दुसरीकडे परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प ओव्हरफ्लो होवून विहिरीची पाणी पातळी वाढली होती. दरम्यान कृषी विभागाने यंदा लाख हजार ६३६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीचे नियोजन केले होते. तर मागील वर्षी लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले होते. परंतु परतीच्या पावसाने यंदा पंधरा हजाराने रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये गहू ४९ हजार ५९७ हेक्टर, हरभरा लाख २१ हजार ९७७, रब्बी ज्वारी १६ हजार ८८७, सुर्यफुल ४३८, मका १६ हजार ५७० १६७ हेक्टर क्षेत्रावरील करडीचा समावेश आहे. आज पावेतो जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी केली आहे. अद्यापही पेरणी सुरू असल्यामुळे रब्बीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होणार आहे. खरीप पिकामध्ये आलेला तोटा भरून काढण्यास या रब्बी पिकांचा शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे.
तालुका निहाय झालेली रब्बीची पेरणी
जळगाव जामोद हजार १६४ हेक्टर क्षेत्र, संग्रामपूर हजार ३३, चिखली २९ हजार ५३७, बुलडाणा ३२ हजार १६९, देऊळगावराजा हजार ४११, शेगाव हजार ६६५, सिंदखेडराजा ११ हजार २४८, लोणार १२ हजार २२४, मेहकर १५ हजार ८०६, खामगाव हजार २८०, नांदुरा हजार ७७०, मलकापूर हजार २१० मोताळा तालुक्यात हजार ४४५ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात रब्बीची झालेली पेरणी
गहु २९ हजार ७११, हरभरा ९६ हजार ६७३, रब्बी ज्वारी ११ हजार ९४२, करडी १०७ १५६ हेक्टर क्षेत्रावर सुर्यफुलाची पेरणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा सर्वाधिक हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी करण्यात अाली आहे.
बातम्या आणखी आहेत...