आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समुपदेशनामुळे दीडशे महिलांचा तुटलेला संसार पुन्हा बहरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव- संशय,मोबाइल व्यसनाधीनतेमुळे त्रस्त झाल्याने ३०० महिलांनी आपल्या तक्रारी खामगाव येथील समुपदेशन केंद्रात तक्रारी नोंदवल्या होत्या. या पैकी समुपदेशन करून दीडशे महिलांच्या तक्रारी आपसात समझोता करून मिटवण्यात आल्या आहे. त्यामुळे आता या महिलांचा संसार पुन्हा वेलीवर चढला आहे. सोयरिक जुळवताना मालमत्ता तपासून पाहताच घाईघाईने संबंध पक्का करतात पुढे मग हाच मुद्दा संसार तुटण्यासाठी कारणीभूत ठरतो. यासह मोबाइलवर सतत बोलत राहणे, इंटरनेट, व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
व्यस्ततेमुळे घरात आपल्या पत्नीलाही वेळ दिल्या जात नाही. त्यामुळे आपसात मतभेद होतात, अशी अनेक कारणे संसारात वाद निर्माण करत असल्याने एका वर्षात ३०० प्रकरणे समुपदेशन केंद्रात दाखल झाली होती. त्यापैकी १८८ जोडपे पुन्हा आंनदाने संसाराला लागले आहेत. न्यायालयामध्ये ५१, फाइल झालेल्या ५५, गुन्हा दाखल ६, स्त्री-धन ८, प्रलंबित २५ बुलडाणा एसपीकडे १० प्रकरणे पाठवण्यात आली आहेत. एवढ्या प्रकरणात ३० प्रकरणे प्रेम विवाहाची आहेत. यातील दीडशे प्रकरणे मार्गी लावणात यश मिळवले आहे.

सामंजस्याची भूमिका ठरणार फायद्याची
पती पत्नीमध्ये वाद होण्यास क्षुल्लक घटनाही कारणीभूत ठरतात. मात्र त्याला वाढवता सामंजस्याची भूमिका घेतल्यास भांडणतंटे निकाली निघू शकतात. तसेच सध्या इगो दुखावल्यानेही बहुतांश जोडपे विभक्त होण्याचा मार्ग पत्करतात. यावर आवर घातला तर संसाराची वाताहत होणार नाही. त्यामुळे सामंजस्य महत्त्वाचे आहे.

‘इगो’ठरतोय कारण
लग्नाआधी योग्य चौकशी करणे महत्त्वाचे आहे. संशय हे सुद्धा संसार दुभंगण्यास कारणीभूत ठरते, तर कधी कधी दोघांचा इगो दुखावल्याने वाद होतात. प्रियंकावावगे, समुपदेशक.

महिलाही जबाबदार
महिलाच संपूर्ण दोषी राहत नाहीत.पुरुषांनीही आपली जबाबदारी ओळखावी. काही ठिकाणी महिलाही जबाबदार असतात. सामंजस्य आवश्यक आहे. स्वातीइंगळे, समुपदेशक.
बातम्या आणखी आहेत...