आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील काेचिंग क्लासेसमध्ये शिकतात केवळ १६ हजार विद्यार्थी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका क्षेत्रातील १५० काेचिंग क्लासेसने महापालिकेचा परवाना घेतला असतानाच दुसरीकडे काेचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र कमी दर्शवली आहे. महापालिका क्षेत्रातील शाळा महाविद्यालये लक्षात घेता विद्यार्थी संख्या ७० हजारापेक्षा अधिक असताना ट्युशन क्लासेस मधील विद्यार्थी संख्या मात्र १६ हजार दिसते आहे. प्रती १०० विद्यार्थ्यांमागे परवाना शुल्क आकारले जात असल्याने महापालिकेला लाखो रुपयाच्या महसुलापासून वंचित राहावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष घातल्यास महापालिकेला लाखो रुपयाचा महसुल मिळू शकतो.

महापालिका क्षेत्रात काही बोटावर मोजण्या इतके व्यवसाय वगळल्यास इतर शेकडो व्यावसायीकांना महापालिकेचा परवाना काढावा लागतो. व्यवसायानुसार परवाना शुल्क आकारले जाते. दरवर्षी घेतलेल्या परवान्याचे नुतनीकरण करणेही नियमानुसार क्रमप्राप्त आहे. या नुसार ट्युशन क्लासचा व्यवसाय करणाऱ्यांनाही महापालिकेचा परवाना काढणे बंधनकारक आहे. या आधी महापालिकेचे क्षेत्रफळ केवळ २८ चौरस किलो मिटर होते. या क्षेत्रफळात महापालिकेच्या परवाना विभागात १५० ट्युशन क्लासेसची नोंद आहे. परंतु आता महापालिकेचे क्षेत्रफळ १२४ चौरस किलो मिटर झाले आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या भौरद, मलकापूर, खडकी, उमरी, खरप, शिवणी, शिवर या गावामध्ये मोठ्या प्रमाणात ट्युशन क्लासेस आहेत. पूर्वी ग्राम पंचायत क्षेत्रात हे ट्युशन क्लासेस असल्याने परवाना घेण्याचा प्रश्न नव्हता. मात्र आता ही गावे महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्याने नियमानुसार या ट्युशन क्लासेसला महापालिकेचा परवाना काढावा लागणार आहे. विशेष म्हणजे परवाना केवळ ट्युशन क्लासेसचा काढावा लागत नाही तर ट्युशन क्लासेस मध्ये किती विद्यार्थी शिकतात? याची संख्या द्यावी लागते. या संख्येनुसार वर्षाचे परवाना शुल्क आकारले जाते.

महापालिकेत १५० ट्युशन क्लासेसची नोंद आहे. परंतु यापैकी बोटावर मोजण्या इतके ट्युशन क्लासेस वगळल्यास अनेक ट्युशन क्लासेसनी विद्यार्थ्यांची संख्या एक ते १०० दर्शवली आहे. एकीकडे ट्युशन क्लासची भरमसाठी शुल्क आकारयचे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची संख्या कमी दर्शवायची, असा प्रकार सुरु आहे. यामुळे महापालिकेला मात्र लाखो रुपयाच्या महसुलापासून वंचित राहावे लागत आहे. एकीकडे उत्पन्न कमी म्हणुन ओरड करणाऱ्या महापालिकेचे मात्र महसुल देणाऱ्या परवाना विभागाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष दिल्यास महापालिकेला लाखो रुपयाचा महसुल मिळु शकतो.

शहरात विविध विषयाचे क्लासेस : शहराच्या गल्लीबोळात ट्युशन क्लासेस आहेत. अगदी पहिली पासून ते दहावी पर्यंत आणि बारावी ते ग्रॅज्युएशन तसेच स्पर्धा परिक्षा, इंग्लिश स्पिकींग क्लासेस आदींसह विविध विषयांचे मार्गदर्शन करणारे शेकडो क्लासेस आहेत. यापैकी अनेक क्लासेसने नोंद केलेली नाही.

केवळ दोनच कर्मचारी पाहतात कारभार
शहरात विद्यार्थी संख्या ७० हजारा पेक्षा अधिक : महापालिका क्षेत्रात पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे ५० हजारा पेक्षा अधिक आहे. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या २० हजार आहे. त्यामुळे केवळ १६ हजार विद्यार्थ्यांनीच ट्युशन क्लासेस लावले, असे म्हणणे चुकीचे होईल. यापूर्वी महापालिकेचे क्षेत्रफळ २८ चौरस किलोमिटर होते. आता हे क्षेत्रफळ वाढून १२४ चौरस किलो मिटर झाले आहे. मात्र परवाना विभागात अनुज्ञप्ती देणारे लिपीक अद्यापही केवळ दोन आहेत. तर पुर्वीच्या महापालिका क्षेत्रात २० हजारापेक्षा अधिक व्यावसायीक आहेत. हद्दवाढ झाल्याने ही संख्या आता दुपटीने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बातम्या आणखी आहेत...