आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅट्राॅसिटी अॅक्टअंतर्गत पाच वर्षांमध्ये १६१ गुन्हे झाले दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत जिल्ह्यात पाच वर्षांत १६१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वर्षाकाठी सरासरी २५ ते ३० गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण असल्यामुळे असे गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने नुकतीच या कायद्यांतर्गत किती गुन्हे दाखल झाले, याची आकडेवारी जाहीर केली आहे.
पोलिस प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जातीय द्वेषाने प्रेरित होऊन अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ नागरी संरक्षण कायदा १९५५ अन्वये घडलेले १५ वर्षांतील गुन्हे केवळ ३५ असल्याचे दिसून येत आहे, तर जातीय द्वेषाने प्रेरित होऊन इतर गुन्हे करणाऱ्यांचा आकडा हा ४७० आहे. पोलिस प्रशासनाच्या रेकॉर्डनुसार दरवर्षीच्या गुन्ह्याच्या आलेखावर नजर टाकली असता गुन्ह्याचे प्रमाण सन २००० पासून सारखेच दिसून येत आहे. अशा प्रकारचे गुन्हे घडूच नये, यासाठी पोलिस प्रशासन दक्ष असल्याचे सांगितल्या जात असले, तरी अशा प्रकारचे गुन्हे घडूच नयेत, यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
१०३५आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल : अनुसूचितजाती, जमातीने दाखल केलेल्या तक्रारींमध्ये १५ वर्षांत हजार ३५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक हजार १३ पुरुष, तर ३६ महिला आरोपींचा समावेश आहे.

नागरी हक्क कायद्यानुसार दोन गुन्हे
२००२ ते २०१५ या वर्षामधील अनुसूचित जाती/ जमातीवरील गुन्हे दाखल होण्याचा आकडा जरी मोठा असला तरी समाधानाची बाब म्हणजे नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ अन्वये दोन गुन्हे दाखल आहेत.