आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणुकीला उरले अाता १७ महिने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला महापालिकेसह राज्यातील दहा महापालिकेच्या निवडणुका मार्च २०१७ मध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्षनिहाय दिलेल्या अहवालातून ही माहिती प्राप्त झाली आहे. २०१२ मध्ये १६ फेब्रुवारीला निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे या वेळी १५ दिवसांचा कालावधी अधिक मिळण्याची शक्यता आहे.
२०१२ मध्ये अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव या महापालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या. या महापालिकांचा पाच वर्षांचा कालावधी २०१७ ला संपणार आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे फेब्रुवारी २०१७ ला निवडणुका होतील, अशी अपेक्षा विविध महापालिकेतील नगरसेवकांनी व्यक्त केली होती. या अनुषंगाने आता हातात केवळ १२ ते १३ महिन्यांचा कालावधी राहिला असल्याने आपापल्या प्रभागात जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न नगरसेवक करत आहेत. परंतु, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वर्षनिहाय दिलेल्या अहवालात या महापालिकेच्या निवडणुका मार्च २०१७ मध्ये घेण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे मार्च २०१७ मध्ये निवडणूक झाल्यास १५ दिवस उशिराने आचारसंहिता लागू होईल.

प्रभाग की वॉर्ड
औरंगाबादमहापालिकेची निवडणूक वॉर्ड पद्धतीने झाली. तर, आता होऊ घातलेली कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूकही वॉर्ड पद्धतीने होत आहे. त्यामुळे मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत वॉर्ड की प्रभाग पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार? याबाबत नगरसेवकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

दहा महापालिकेच्या निवडणुका
मार्च२०१७ ला राज्यातील दहा महापालिकेच्या निवडणुका होताहेत. त्याचबरोबर एप्रिल २०१७ मध्ये उल्हासनगर, चंद्रपूर, जून २०१७ मध्ये भिवंडी-निजामपूर, ऑगस्ट २०१७ मध्ये मिरा भाईंदर, मे २०१७ मध्ये परभणी, लातूर, ऑक्टोबर २०१७ मध्ये नांदेड वाघाळा या महापालिकेच्या निवडणुका होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...