आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१७ वर्षात १६ खटल्यांमध्ये शिक्षा, अॅक्ट्रासिटी अॅक्ट अन्वये ठोठावण्यात आली शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यामध्ये १७ वर्षात अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार (अॅट्रासिटी कायदा) ३९१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, या पैकी न्यायालयात १६ गुन्ह्यामध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे. तर गत ११ वर्षापासून आजपर्यंत १४६ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.

राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. त्यात अॅक्ट्रासिटी कायद्यात सुधारणा होण्याची एक मागणी आहे. या संदर्भानुसार जिल्ह्यातील अॅक्ट्रासिटी अॅक्टची आतापर्यंतची आकडेवारी पाहिली असता, २००० ते ऑगस्ट २०१६ पर्यंत १६ गुन्ह्यांमध्ये या कायद्यानुसार शिक्षा झालेली आहे. अकोला पोलिसांच्या संकेतस्थळावर २००० ते ऑगस्ट २०१६ मध्ये अनुसूचित जातीमधील नागरिकांनी ३२९ गुन्हे दाखल केले आहेत. तर अनुसूचित जमातीमधून ६२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यातील १४ गुन्ह्यांचा तपास सुरु असून १७६ गुन्हे पोलिस तपासावर निकाली काढण्यात आले आहेत. तसेच २०१३ पासून ८८ गुन्हे न्यायालयात दाखल असून, या साडेतीन वर्षात एकाही आरोपीला या कायद्यानुसार शिक्षा झालेली नाही.

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा नियम १९९५ नुसार गेल्या पाच वर्षांत सावधगिरी प्रतिबंधात्मक उपाय काय राबवले गेले, दलित कुटुंबास पोलिस संरक्षण दिले की नाही, जिल्हा दक्षता नियंत्रण समितीमधील निर्णय, अत्याचारात बळी ठरलेल्या व्यक्ती कुटुंबीयांना सुविधा दिल्या की नाही, याची माहिती पोलिसांनी जाहीर करण्याची मागणी या निमित्ताने पुढे येत आहे

पोलिसांवर होत असलेले आरोप : दलित अत्याचाराची फिर्याद घेण्यास पोलिस टाळाटाळ करतात. तक्रार घेतलीच तर फिर्यादी साक्षीदारांचे जबाब व्यवस्थित नोंदवले जात नाहीत. अनेकदा आरोपींना पाठीशी घातले जाते. आरोपपत्र दाखल करताना त्यात त्रुटी निर्माण करून आरोपींना निर्दोष सुटण्यासाठी प्रयत्न केले जातात. घटनास्थळी भेटही दिली जात नाही. आरोपींना जामीन देताना घातलेल्या अटींचा भंग केला तरी पोलिस अधिकारी नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा अनेक कारणामुळे अॅक्ट्रॉसिटीच्या खटल्यात आरोपी निर्दोष सुटतात.

न्यायालयात दाखल केलेले खटले -२८९
शिक्षा झालेले आरोपी -१६
निर्दोष सुटलेले आरोपी-१२७
न्यायालयीन प्रकरणे -१४६
२००० ते ऑगस्ट २०१६ पर्यंतचे गुन्हे
अनुसूचित जाती -३२९
अनुसूचित जमाती-६२
पोलिस तपासावर निकाली काढलेले प्रकरणे-१७६
बातम्या आणखी आहेत...