आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाव्या दिवशी 18 उमेदवारांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी फेब्रुवारीला एकुण १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.यात भाजप,शिवसेना, भारिप-बमसंसह अपक्षांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ आता दोन दिवस राहिले असल्याने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी होऊ शकते. दरम्यान आता पर्यंत एकुण २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 

२७ जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. रविवार २९ जानेवारीलाही उमेदवारी अर्ज स्विकारण्याचे काम सुरु होते. मात्र २७ ते २९ असे सलग तीन दिवस उमेदवारी अर्जच दाखल झाले नाहीत. परंतु ३० जानेवारीला मात्र चार अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. तर ३१ जानेवारीला पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. एक फेब्रुवारीला झोन क्रमांक एक मध्ये प्रभाग क्रमांक १-ब अपक्ष उमेदवार सय्यद वाजेदा परविन सय्यद रहीम यांनी अर्ज दाखल केले. 

तर झोन क्रमांक दोन मधील प्रभाग क्रमांक १३ -ड मधुन गजानन साकला यांनी भारिप-बमसंतर्फे,प्रभाग १३-अ मधुन भाजपतर्फे सुजाता अहिर,सविता ढाकरे,प्रभाग क्रमांक ५-ड मधुन शुभम घिमे (अपक्ष),प्रभाग क्रमांक ५-ब भाजपतर्फे अर्चना मसने, प्रभाग क्रमांक ५-अ मधुन भाजपतर्फे सुभाष खंडारे, झोन क्रमांक तीन मधील प्रभाग क्रमांक ८-ड मधुन भारिप-बमसंतर्फे महेंद्र भोजने, झोन क्रमांक चार मधील प्रभाग क्रमांक ११-अ मधुन विद्यमान नगरसेविका मेहरुन्निसा शेख अनलहक कुरेशी (अपक्ष),प्रभाग १८ अ- सपना नवले, प्रभाग क्रमांक १८ -ब संतोष दुतोंडे, प्रभाग क्रमांक १८-ड अजय वाळसकर (सर्व शिवसेना), झोन क्रमांक पाच मधील प्रभाग क्रमांक २०-अ मधुन अविनाश मोरे, प्रभाग क्रमांक २० -क माधुरी गवळी, प्रभाग क्रमांक २० -ड विकास चोपडे (सर्व शिवसेना), प्रभाग क्रमांक १४-अ मधुन प्रिती संदाशिव (अपक्ष), प्रभाग क्रमांक १४ -क मधुन भारिप-बमसंतर्फे किरण पाखरे,प्रभाग क्रमांक १४ -ड मधुन शेख हनीफ रसुल अशा एकुण १८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे दोन फेब्रुवारीला भाजप,सेना, भारिप-बमसं, एमआयएम,कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, समाजवादी पक्ष, बसपसह विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात. 

अकोला विकास महासंघाने पुन्हा दाखल केले अर्ज 
अकोला विकास महासंघातर्फे मंगळवारी प्रभाग क्रमांक मधील अ,ब,क आणि मधुन किरण मेश्राम, मोहन येवले, माधुरी मेश्राम, सुनील मेश्राम यांनी अर्ज दाखल केले होते. फेब्रुवारीला या चौघांनी पुन्हा याच प्रभागातून अर्ज दाखल केले. तर प्रिती संदाशिव यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे प्रभाग क्रमांक १४ -क मधुन उमेदवारी अर्ज दाखल केला तर फेब्रुवारीला प्रभाग क्रमांक १४ - मधुन उमेदवारी अर्ज दाखल केला. 
बातम्या आणखी आहेत...