आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजसेवेसाठी जिल्ह्यात पुढे आल्या १८,७७३ संस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सात तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या अकोला जिल्ह्यात सामाजिक कार्यासाठी १८ हजार ७७३ संस्था पुढे आल्या असून, त्यांचे सेवाकार्य अविरत सुरू आहे. दरम्यान, मार्च २०१६ ला संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर जिल्ह्यात २१ हजार ९९८ संस्था मंडळे नोंदणीकृत झाली आहे.
सेवाभावी कार्य करणाऱ्या प्रत्येक संस्था, संघटना किंवा मंडळाला शासनाच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागते. त्यामुळे कोणतेही समाजकार्य सुरू करण्यापूर्वी एकप्रकारे या कार्यालयाची परवानगी घेणेच अपरिहार्य असते. जिल्हाभरासाठीचे कार्यक्षेत्र असलेल्या या कार्यालयामार्फत पाच प्रकारच्या संस्था, मंडळांना नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते.
ए, बी, सी, डी, एफ अशी या नोंदणी प्रमाणपत्रांची वर्गवारी आहे. मध्ये हिंदूंची मंदिरे, बी मध्ये मुस्लिमांची प्रार्थनास्थळे, सी मध्ये पारशी समुदायाची पूजास्थाने (अग्यारी), डी मध्ये ख्रिश्चनांचे चर्च तर मध्ये सामाजिक धार्मिक असे दोन्ही उद्देश जपणाऱ्या संस्था आणि एफमध्ये सार्वजनिक उपक्रम चालवणाऱ्या संस्था मंडळे असा क्रम आहे.

ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार ७७३ संस्था एफ श्रेणीत नोंदणीकृत झाल्या आहेत. याचाच अर्थ सामाजिक उपक्रम चालवणाऱ्या संस्थांचे मोठे जाळे अकोला जिल्ह्यात पसरले आहे. या खालोखाल हजार ७६० ही संख्या हिंदू धार्मिक संस्थांची आहे. यामध्ये मंदिरे संस्थाने समाविष्ट आहेत. यासोबतच धार्मिक सामाजिक असा दुहेरी उद्देश जपणाऱ्या संस्था अर्थात चॅरिटेबल ट्रस्टची संख्या हजार १०५ आहे.

मशीद,दर्गा वक्फ बोर्डाकडे : जिल्ह्यातमुस्लिमांची प्रार्थनास्थळे (मशीद, र्इदगाह दर्गा) ३५४ आहेत. सद्य:स्थितीत यातील बहुतेक संस्था वक्फ बोर्डाला हस्तांतरित झाल्या असल्याने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे तेवढे काम कमी झाले आहे. ज्या ३०-३२ संस्थांनी वक्फ बोर्डमध्ये जाण्यास नकार दिला, तेवढ्याच संस्थांचे नियंत्रण या कार्यालयाला करावे लागते.
एकअग्यारी, पाच चर्च : जिल्ह्यातपारशी लोकांचे केवळ एकच प्रार्थनास्थळ आहे. त्याला अग्यारी म्हणतात. ही अग्यारी अकोला शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर आहे. पारशी नववर्षदिनी तिथे कार्यक्रम असतो. या प्रार्थनास्थळाची नोंदणी १९६० मध्ये करण्यात आली. या शिवाय ख्रिश्चनांचे प्रार्थनास्थळ असलेल्या चर्चची संख्या पाच आहे.

दरमहा ७०-७५ नव्या संस्थांचा उदय : सार्वजनिकउपक्रम राबवणाऱ्या ‘एफ’ श्रेणीतील संस्थांची संख्या जास्त असण्याचे कारणही तसेच आहे. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार दरमहा ७० ते ७५ नव्या संस्थांची नोंदणी केली जाते. एखाद-दुसरी धार्मिक संस्था आणि एखादी दुहेरी उद्देश जपणारी संस्थाही महिन्याला नोंदणीकृत होते.

तक्रारी कमी
^काही पदाधिकारीकार्यकारिणीतील इतरांच्या तक्रारी करतात, अशी संख्या दरमहा पाच-सहा असते. निरीक्षकांमार्फत त्या सोडवल्या जातात.'' अशोक ताकवाले, सार्वजनिकन्यास नोंदणी कार्यालय.