आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रक रिव्हर्स आल्याने दाेघांचा झाला मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वऱ्हाडघेऊन आलेला ट्रक अचानक उतारावरून मागे सरकल्याने ट्रकच्या मागच्या एका चाकाखाली नवरदेवाचा जावई, तर दुसऱ्या चाकाखाली १० वर्षांचा भाचा आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जावयाच्या भाच्याच्या मृत्यूने लग्नाच्या आनंदावर विरजन पडले. ही हृदद्रावक घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता शिवणी येथे घडली.
शिवणी येथील शेख नजीर यांच्या मुलीचे लग्न सोनटक्के प्लॉट येथील शेख इमरान शेख रऊफ यांच्याशी ठरले होते. शुक्रवारी सकाळी १० वाजता नवरदेव वऱ्हाडींनी भरलेला ट्रक शिवणी येथे पोहोचला. ट्रकचालकाने उतारावर ट्रक उभा केला तो खाली उतरला. चालक ट्रकचे मागचे फाटक उघडत असताना अचानक ट्रक गेअरमधून निघाला मागे सरकू लागला. या वेळी ट्रकच्या आजुबाजूने अनेक जण उभे होते. अशातच ट्रकच्या एका चाकाखाली नवरदेवाचे जावई शेख मकसूद शेख मेहेबुब, वय ३० वर्ष, रा. भगतवाडी, खैर मोहम्मद प्लॉट, जुने शहर दुसऱ्या चाकाखाली दुसऱ्या बहिणीचा १० वर्षांचा मुलगा जुनेद खान लाल खान, वय १२ रा. सोनटक्के प्लॉट हा आला. हे दोघेही ट्रकच्या चाकाखाली दबल्या गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दोघेचाकाखाली दगड लावत होते : काहीप्रत्यक्षदर्शींच्या मते ट्रक मागे सरकू लागल्यानंतर शेख अक्रम नवरदेवाच्या दुसऱ्या बहिणीचा मुलगा जुनेद खान लाल खान यांनी ट्रकला थांबवण्यासाठी मागच्या दोन चाकांना दगड लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकखाली दगड लावण्यापूर्वीच ते चाकाखाली दबले त्यांचा मृत्यू झाला. तर पोलिसांच्या मते चालक ट्रकचे मागचे फाटक उघडत असताना ट्रक आपोआप मागे सरकला त्याखाली दोघे अाले.

ट्रक मागे आल्याने घडली दुर्घटना
^ट्रकमागे सरकला तेव्हा ट्रकच्या कॅबिनमध्ये काही मुले बसली होती की नव्हती किंवा मृतक ट्रकच्या चाकाला दगड लावण्याचा प्रयत्न करत होते काय, हे तपासातूनच पुढे येईल. पण, ट्रक मागे आल्यामुळे दुर्घटना घडल्याची नोंद घेतली आहे. शिरीषखंडारे, ठाणेदार, एमआयडीसी ठाणे
बातम्या आणखी आहेत...