आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीचे बर्लिननंतर 84 वर्षांनी मल्लखांब आॅलिम्पिक गाजवणार; 2020 ऑलिम्पिक स्‍पर्धा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे (एचव्हीपीएम) मल्लखांबपटू  २०२०  मध्ये टोकियो येथे होणाऱ्या आॅलिम्पिकच्या उद््घाटन समारंभात चित्तथरारक कवायती सादर करणार अाहेत. या दृष्टीने २०१८ पासून एचव्हीपीएम येथेच सरावाला सुरुवात होईल. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच भारतीय खेळाचे आॅलिम्पिकच्या उद्््घाटन समारंभात प्रदर्शन होईल. 


या संदर्भात भारतीय मल्लखांब महासंघाचे अध्यक्ष डाॅ. रमेश इंडोलिया,  एचव्हीपीएमचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांनी सांगितले,  अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा या क्षेत्रातील लौकिक मोठा आहे. ऑलिम्पिक आयोजन समिती (आयओसी) कडून १२ नोव्हेंबर रोजी टोकियो येथे उद््घाटन समारंभात मल्लखांबाचे कौशल्य दाखवण्याचे निमंत्रण दिले आहे. एचव्हीपीएमने आयओसी तसेच आयोजन समितीच्या सर्व अटी मान्य करत, हे निमंत्रण स्वीकारले आहे. याचा सर्व खर्च आयओसी करणार आहे. 


भारतातून जाणाऱ्या मल्लखांब संघात ५० टक्के मल्लखांबपटू एचव्हीपीएमचे तर उर्वरित खेळाडू  देशाच्या विभिन्न भागातील असतील. यात २४ मल्लखांबपटू, ६ अधिकारी आणि एक पथक प्रमुख राहील. एचव्हीपीएमची स्थापना १९१२ मध्ये झाली. शहीद राजगुरू यांनी येथे प्रशिक्षण घेतले होते. एचव्हीपीएमने आतापर्यंत ४५ देशांत मल्लखांबाचे कौशल्य दाखवले आहे.

 

पुढील स्‍लाइड वर वाचा, मल्लखांबाचे प्रकार : पाण्यावरील कसरती चित्तथरारक... 

बातम्या आणखी आहेत...