आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 226 District Panchayts In Social, Economic Survey Launched

जिल्ह्यात २२६ ग्रामपंचायतींमध्ये सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्यातील५४२ पैकी ३१६ ग्रामपंचायतींमध्ये सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षण २०११ च्या सर्वेक्षणाच्या प्रारूप याद्या संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. उर्वरित २२६ ग्रामपंचायतींमध्ये या याद्या ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवकांमार्फत प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या यादीची प्रत सॉफ्ट कॉपीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय गटविकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध राहील. एक प्रत एनआयसीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल. अप्राप्त तांत्रिकदृष्ट्या कमी पडलेले गट नाव कुटुंब समाविष्ट करण्यासाठी गटातील कुटुंबांनी नमुना प्रश्नावली मुदतीत भरून संबंधित ग्रामपंचायतीकडे सादर करावे. त्यानंतर यादीत त्याचा समावेश करता येईल. सामाजिक, आर्थिक जात सर्वेक्षण २०११ प्रसिद्ध प्रारूप यादीमधील कुटुंबांना आपले दावे आक्षेप नोंदवायचे असतील, तर यादी प्रसिद्ध झाल्यापासून ग्रामीण भागासाठी ३० दिवस संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाकडे शासनाने दिलेल्या प्रपत्र अ, ब, क, ड, फॉर्ममध्ये एकावेळी फक्त एकच नोंदवता येईल.

नमुना प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीमधील माहितीवर आक्षेप दाखल करण्याबाबत, नाव कमी करण्याबाबत, नमुना प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीमधील माहितीच्या तपशिलात सुधारणा फेरबदल करण्याबाबतचे अधिकार पंचायतस्तरावर अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रथम अपिलीय अधिकारी ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी, तहसीलदार असतील.
एसडीओ द्वितीय अपिलीय अधिकारी
ग्रामीणक्षेत्रासाठी उपविभागीय अधिकारी हे द्वितीय अपिलीय अधिकारी म्हणून कार्य करतील. अपीलकर्त्यांनी सुनावणीच्या वेळी पुराव्यासह हजर राहून आपली बाजू मांडावी. मुदतीनंतरचे दावे, हरकती स्वीकारण्यात येणार नाहीत.

नागरिकांनी दखल घ्यावी
^दावेआक्षेपासंदर्भात विहित नमुन्यातील अर्ज हे ग्रामीण भागासाठी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.'' प्रकल्पसंचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.