आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्‍यात सहा महिन्यांमध्ये २३ मुली बेपत्ता, प्रेमप्रकरणातून प्रमाण वाढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कौटुंबिक अाणि प्रेमप्रकरणातून मुली घर सोडून जाण्याचे प्रमाण अकोल्यात वाढले आहे. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यातून १८ ते ३० या वयोगटांतील २३ मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातही शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सिव्हिल लाइन्स आणि जठारपेठ परिसरातून महिन्याला एक मुलगी हरवल्याची नोंद पोलिसांत होत आहे.

प्रेमात पडून घराबाहेर पडलेल्या मुलींचे प्रमाणही जास्त आहे. मुलगी पडून गेली की, पालक आधी दोन ते तीन दिवस तिचा शोध घेतात. तिचा शोध लागला तर तडजोड करून लग्न लावून देतात. मात्र, या कालावधीत जर मुलगी सापडली नाही, तर सामाजिक बदनामीपोटी भितभित पोलिस ठाण्यात जातात. तक्रार करतात, पोलिस गुन्हा दाखल करण्याऐवजी हरवल्याची नोंद घेतात आणि फाइल क्लोज करतात. ५० वर्षेच्या वर वय असलेल्या महिला घरून निघून गेली, तर हरवल्याची तक्रार ठीक आहे. मात्र, तरुण मुलगी घरून निघून गेली, तीसुद्धा हरवल्याच्या तक्रारीत कसे बसते. हे पोलिसांना ठाऊक आहे. बाहेर गेली, घर विसरली तर हरवणे एवढा अर्थ सामान्यांना माहीत आहे. मात्र, सर्वच पोलिस ठाण्यात मुलगी असो, मुलगा घरून बेपत्ता असला म्हणजे त्याची नोंद हरवल्याचीच घेतल्या जात अाहे. जानेवारी २०१५ ते जुलै २०१५ दरम्यान जिल्ह्यातील २० पोलिस ठाण्यांपैकी १६ पोलिस ठाण्यांमध्ये २३ मुली हरवल्याची नोंद आहे, तर ५० वर्षांच्या वयोगटांतील चार महिला हरवल्याची नोंद पोलिसांमध्ये अाहे.

हरवणाऱ्या महिलांकडे पाहण्याचा पोलिसांचा तसेच समाजाचाही दृष्टिकोन फारसा संवेदनशील नसतो. काही दिवसांपूर्वी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात शिवणी येथील एक पुरुष, त्याचा मुलगा आणि मुलगी आले. पती सांगू लागला की त्याची पत्नी त्याच्या डोळ्यादेखत ओळखीच्या परपुरुषाच्या दुचाकीवर बसून गेली. ती पुन्हा आलीच नाही. तिची परत येण्याची वाट पाहिली. पण, काही फायदा नाही, असे तो व्यक्ती सांगू लागला. पण, पोलिसांनी त्याची उलटतपासणी केली. फोटो घेऊन या, आम्ही सांगतो, तशी तक्रार द्या, असे म्हणून तक्रार लिहून घेतली. त्यात कुठेही परपुरुषांसोबत गेल्याची नोंद केली नाही. ज्याच्यासोबत गेली त्याचे नाव माहीत असतानाही तशी नोंद झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही, झाली केवळ हरवल्याची नोंद, अशा व्यवहारामुळे आणि समाजात बदनामी म्हणून अनेक जण तक्रारी देण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे २३ मुली बेपत्ता झाल्याची नोंद हे पोलिसांजवळ असलेले रेकॉर्ड आहे, तर नोंद झालेल्यांची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, प्रकरणाचे गंभीर वास्‍तव..