आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महान धरणातील जलसाठा पोहोचला २६ टक्क्यांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महान- अकोला शहरासह नदीकाठावरील ५३ खेड्यांची तहान भागवणाऱ्या महान धरणाच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
ऑगस्टला ५.६१ टक्क्यांवर असलेला जलसाठा नंतर झालेल्या दमदार पावसामुळे सध्या २६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुख्य नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने धरणाच्या जलसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.
१२ ऑगस्टला सकाळी वाजता महानची पाणीपातळी ११२१ फूट झाली आहे. यामुळे अकोलेकरांवर येणारी पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात सुटली आहे. ११ ते १२ ऑगस्टच्या सकाळी वाजेपर्यंत महान परिसरात मि.मी. तर ते १२ ऑगस्टदरम्यान २४६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मालेगाव परिसरात आणखी दमदार पावसाची आवश्यकता आहे.
महान येथील धरणाच्या जलसाठ्यात मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. धरणाच्या जलसाठ्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याने अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणात बसवलेल्या एकूण पाचपैकी चौथ्या व्हॉल्व्हच्या जवळ पाणी पोहोचले आहे. पुढील काळात आणखी दमदार पाऊस झाल्यास मुख्य गेटजवळ पाणी येण्यास वेळ लागणार नाही. उपविभागीय अधिकारी एन. जे. बारड यांच्या मार्गदर्शनात शाखा अभियंता सय्यद, एस. व्ही. जानोरकर, पिंपळकर हे जलसाठ्याकडे लक्ष ठेवून आहेत.
- अकोला शहरासह मूर्तिजापूर नदी काठावरील गावांना होतो पाणीपुरवठा
- मागील २४ तासांत मिमी., तर १२ दिवसांत केली २४६ मिमी. पावसाची नोंद
- मालेगाव परिसरात दमदार पावसाची गरज