आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीची पुनर्परीक्षा देणार ३,७०५ विद्यार्थी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दहावीतनापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शिक्षणमंत्र्यांनी दहावीच्या निकालानंतर लगेच दीड महिन्यात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार २१ जुलैपासून या नापास मुलांची पुनर्परीक्षा सुरू होणार आहे. अकोला जिल्ह्यातील जवळपास हजार ७०५ विद्यार्थी ११ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.
शिक्षण परिषदेच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये शालान्त प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात पुनर्परीक्षा घेतली जाते. ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेतल्यामुळे मुलांचे एक वर्ष वाया जाते. त्यामुळे ही पद्धत अाता बंद करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी या वर्षीपासून होत आहे. फेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ जुलै ते ऑगस्टदरम्यान होणार अाहे. परीक्षेनंतर १५ दिवसांत याचा निकाल जाहीर केला जाणार असून, या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश दिले जाणार आहे.

दहावीच्या या पुनर्परीक्षेसाठी ११ परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजे दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. अकोला शहरात ना. मा. चौधरी विद्यालय, मुंगीलाल बाजोरिया हायस्कूल, बी. आर. हायस्कूल आणि शिवाजी हायस्कूल, मुख्य शाळा हे चार परीक्षा केंद्र आहेत, तर तालुका स्तरावर अकोट शहरात नर्सिंग विद्यालय आणि कृषी विद्यालय तसेच तेल्हारा येथील एस. बी. हायस्कूल, बार्शिटाकळी येथे सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, बाळापूर येथे इस्लाम हायस्कूल, पातूर येथे तुळसाबाई कावल हायस्कूल आणि मूर्तिजापूर येथे गाडगेबाबा स्कूल या पाच परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. यात शहरात जिल्हास्तरावर बैठक भरारी पथक असणार आहे. तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विभाग अाणि शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) विभाग यांचे प्रत्येकी एक भरारी पथक असणार आहे. शिवाय तालुका पातळीवर तहसीलदार यांच्या निर्देशानुसार पथक असणार आहे.
सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजे दरम्यान परीक्षा
विद्यार्थी जिल्ह्यातील ११ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.
३,७०५

पुनर्परीक्षेचे नियोजन झाले पूर्ण
यावर्षीपासून दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विभाग आणि शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) या दोन विभागाने परीक्षेचे नियोजन केले आहे, तर तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या नियोजनानुसार कार्य केले जाईल.'' अशोकसोनवणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक).
कसोटी
बातम्या आणखी आहेत...