आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलडाणा - बोलेरो वाहनातून अवैधरित्या देशी दारूची वाहतुक करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी पकडले. यावेळी त्यांच्या ताब्यातून ५४ हजार रुपये किंमतीची देशी दारू साडे चार लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकुण पाच लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. ही धडक कारवाई १४ नोव्हेंबर रोजी देऊळगाव मही रस्त्यावर करण्यात आली आहे.
अवैध दारुच्या वाहतुकीवर निर्बंध लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांचे नेतृत्वात पोहेकॉ ज्ञानेश नागरे, सैय्यद हारुण, पोलीस नाईक दिपक पवार, चालक पोकॉ गजानन जाधव असे पोलीस पथक तयार करण्यात आले.
पोलीस पथकाने देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील खडकपूर्णा ढाब्याचे बाजुला रस्त्यावर नाकाबंदी केली. यावेळी देऊळगावराजा कडुन एम.एच. २८/ व्ही/ ५०८४ या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची बोलेरो येतांना पोलिसांना दिसली. पोलिस पथकाने सदर बोलेरो थांबवुन वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये आरोपी संजय बाजीराव जाधव, अंबादास आश्रुबा बुरुकुल, रा. देऊळगावराजा शरद कारभारी मांटे रा.गव्हाण हे बसलेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ५३ हजार ७६० रुपये किंमतीची देशी दारु सखु संत्रा कंपनीचे सीलबंद सोळा बॉक्स साडे चार लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकुण लाख हजार ७६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. प्रकरणी आरोपी विरुध्द देऊळगावराजा पोलिसात मुंबई दारुबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.