आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच अपार्टमेंटमधील तीन घरे भरदिवसा फोडली, 20 हजारांचा माल लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
अकोला- अकोला शहरातील माधव नगर, बालाजी नगर येथे भरदिवसा दोन अपार्टमेंटमध्ये चोरीची घटना बुधवारी घडली आहे. यामध्ये एकुण २० हजाराच्या जवळपास ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माधव नगर येथील मधु रेसिडेन्सी अपार्टमेन्ट मधील एफ दोन क्रमांकाच्या फ्लॅटमधे राहणाऱ्या प्रशांत साहेबराव ठाकरे (३६) यांच्या राहत्या फ्लॅटच्या दाराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला.

यावेळी त्यांनी संपूर्ण घरातील सामान अस्ताव्यस्त केले. कपाटामधील ठेवलेले दागिने, पाच ग्रॅमची अंगठी, १५ ग्रॅम चांदीचा गोप तर बालाजी नगरातील गोल्डन अपार्टमेन्ट मधील क्रमांक पाच येथे राहणारे प्रमोद हरिभाऊ बकाने, क्रमांक सहा येथील पी.के. जाधव यांचे फ्लॅट फोडून अंदाजे अडीच हजार रूपये असा तिन्ही मिळून एकूण २० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
 
या प्रकरणी जाधव, ठाकरे, बकाने यांनी खदान पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक एस भास्कर करीत आहे.
बातम्या आणखी आहेत...