आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३३ कोटींच्या कामांसाठी ३ महिने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हानियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिलेल्या मंजुरीनुसार जानेवारी, फेब्रुवारी मार्चदरम्यान ३२ कोटी १८ लाख रुपयांतून विविध विकासकामे केली जाणार आहेत.
सन २०१५-१६ साठी वितरित करण्यात आलेल्या ११५ कोटी ६४ लाख निधीपैकी ६० कोटी ९७ लाख रुपये खर्च अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, २२ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन सभेच्या आढावा बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी विविध क्षेत्रांच्या विकासासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार १५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यास पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंजुरात दिली आहे. पशुवैद्यकीय, मच्छीमार, वन विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महापालिका, महिला बालविकास, कृषी विभाग, रेशीम उद्योग, विद्युत विभागासाठी ३२ कोटी १८ लाख रुपये पुनर्वियोजन प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार आगामी तीन महिन्यांत या घटकाचा विकास करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाने ८१ लाख ७५ हजार, मत्स्य बीज मच्छीमार संस्थांना सहकार्य लाख, वनामध्ये वन रोपण ८३ लाख २६ हजार, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना कोटी ४० लाख, ग्रामीण विकास यंत्रणा ९१ लाख ९० हजार, महिला रुग्णालयाचा विस्तार ४९ लाख ९८ हजार, शुभमंगल सामूहिक योजना ४७ लाख ७८ हजार, कृषी विभाग योजना ७३ लाख हजार, दलितवस्ती विकास कोटी २३ लाख, दलित वस्ती विकास अकोला वगळता कोटी ८३ लाख, रेशीम उद्योग २० लाख ५० हजार, विद्युत विकास कोटी ४५ लाख, असे एकूण ३२ कोटी १८ लाख उपलब्ध आहेत.

सन २०१६ मधील खर्चाचेही व्हिजन
२०१६-१७ साठीचा वार्षिक योजना प्रारूप आराखडा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. पाटील यांनी मंंजूर केला आहे. सर्वसाधारण योजनासाठी १०० कोटी २० लाख, अनुसूचित जाती उपाययोजनासाठी ७४ कोटी ६२ लाख आदिवासी उपाययोजनासाठी ६३ कोटी २४ लाख, असे ३७० कोटी ८७ लाखांचे नियोजन झाले आहे.