आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात ४.३० कोटी किंमतीच्या डाळी जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - डाळींचीसाठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध केंद्र सरकारने मोर्चा उघडल्यानंतर दुसऱ्या दिवशी अन्न पुरवठा विभागाने येथील एमआयडीसीमध्ये धान्याच्या गोडाउनवर छापे टाकले. त्यात त्यांना चार कोटी ३० लाख रुपये किमतीची चणा डाळ, मूग आणि सोयाबीनची साठेबाजी केलेली आढळून आली. पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार संतोष शिंदे यांनी ती जप्त केली आहे. पुरवठा विभागाच्या दमदार कारवाईमुळे साठेबाजांनी धास्ती घेतली अाहे.

डाळींचे भाव गगनाला भिडल्यानंतर सर्वच स्तरातून सरकारवर टीका होत आहे. त्यामुळे देशभर कालपासून डाळींवर धाडसत्र सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी पुरवठा विभागाने एमआयडीसीतील गोडाउनची झाडाझडती घेतली होती. मात्र, शहानिशा होण्याचे बाकी असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा बुधवारी तपासणी केली असता, त्यांना अवैधपणे धान्याचा साठा केलेला आढळून आला. त्यात त्यांनी हिरा अग्रो इंडस्ट्रिजमधून पक्का चणा हजार १३ क्विंटल, माणिकजी पॅलेसमधून १,४९२ क्विंटल चणा डाळ, ५४२ क्विंटल चणा, ३३८ क्विंटल मूग आणि कारगिल इंडिया प्रा. लि. मधून हजार ८९२ क्विंटल सोयाबीन, असा धान्यसाठा जप्त केला आहे. ही कारवाई पुरवठा अधिकारी अनिल ताकसाडे आणि अकोला तहसीलदार संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनात बुधवारी दुपारी दीड ते चार वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

नागपूर | नागपूरजिल्हा पुरवठा विभागानेही कंबर कसली असून, बुधवारी २१ ऑक्टोबरला नागपूर जिल्ह्यात एकूण ३७ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून, कापसी येथील मॉ उमिया आैद्योगिक वसाहत येथील चार गोदामात एकूण २९ व्यापाऱ्यांचा ५.५ कोटी रूपयांचा कडधान्य, तेलबियांचा साठा जप्त केला.