आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ चार मुली अकोटला आढळल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - नाशिक जवळील मालेगाव येथून बेपत्ता झालेल्या चार अल्पवयीन मुली अकोट आढळल्या असून, त्यांना मालेगाव पोलिसांच्या ताब्यात देणार अाहे,अशी माहिती रविवारी १८ जूनला ठाणेदार सी.टी इंगळे यांनी दिली. 
 
मालेगाव येथून झयना बी तहरीन आसीफ (१२ )कुलसुम तहरीन आसीफ( ९) मयम तहरीन आसीफ( ५) या तीन बहीणी आणि त्यांची मैत्रिण मिसबा अमीन खान( ८) सर्व रा मालेगाव या चौघी मालेगाव येथून बेपत्ता अाहे,अशी माहिती नियंत्रण कक्षाद्वारेे अकोट शहर पो.स्टे.ला मिळाली ठाणेदार सी.टी इंगळे यांनी उपनिरीक्षक शरद माळी यांच्या नेतृत्वात पथक नेमले.पथकाने अमीन पुरा भागात झडती घेतली असता या चार मुली रशीदा बी अब्दुल अजीज यांच्या घरी आढळून आल्यात.शहर पोलिसांनी या चार ही मुलींना ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी नेमके काय आहे? यांची चौकशी वृत्त लिहीपर्यंत सुरूच होती.ही माहिती मालेगाव पोलिसांना कळवली.हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे,ठाणेदार सी.टी.इंगळे,यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक शरद माळी,पोकॉ जितेंद्र कातखेडे,अमरदीप गुरू,वीरेंद्र लाड, दीपाली देशमुख,आदींनी कारवाई केली आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...