आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात महिलांसाठी ४० जागा आरक्षित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्या प्रभाग रचनेसह आरक्षण सोडतीमध्ये नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २२ जागा राखीव आहेत. या राखीव जागेंसह खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या जागांमध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.
सप्टेंबरला ११.३० वाजता आरक्षणाच्या प्रक्रियेचा प्रारंभ उपायुक्त समाधान सोळंके यांनी केला. पहिल्या टप्प्यात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या १४ जागांपैकी सात जागा, अनुसूचित जमातीसाठी असलेल्या दोन जागांपैकी एक जागा तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गातील २२ पैकी ११ जागा ईश्वर चिठ्ठी काढून महिलांसाठी आरक्षित केल्या, तर राहिलेल्या खुल्या जागांमधून ५० टक्के जागा ईश्वरचिठ्ठीने महिलांसाठी राखीव केल्या. या वेळी आयुक्त अजय लहाने, उपायुक्त सुरेश सोळसे, सहाय्यक आयुक्त दीपाली भोसले, जितकुमार शेजव, नगरसचिव अनिल बिडवे, जी. एम. पांडे आदींसह अनेक अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

अशा आहेत आरक्षित जागा
अनुसूचित जाती : अनुसूचितजातींसाठी प्रभाग क्रमांक दोन-अ, प्रभाग क्रमांक तीन-अ, प्रभाग क्रमांक चार -अ, प्रभाग क्रमांक पाच-अ, प्रभाग क्रमांक १४- अ, प्रभाग क्रमांक१९-अ, प्रभाग क्रमांक २० -अ तर अनुसूचित जाती महिलांसाठी प्रभाग क्रमांक ६-अ, प्रभाग क्रमांक ७-अ, प्रभाग क्रमांक ९-अ, प्रभाग क्रमांक १२-अ, प्रभाग क्रमांक १३-अ, प्रभाग क्रमांक१६ अ, प्रभाग क्रमांक १८ अ.

अनुसूचितजमाती : अनुसूचितजमातीसाठी एकूण दोन जागा राखीव आहेत. प्रभाग क्रमांक १७- सर्व साधारण अनुसूचित जमाती तर प्रभाग क्रमांक १९ अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग : नागरिकांचामागास प्रवर्गासाठी एकूण २२ जागा आरक्षित आहेत. यात महिलांसाठी प्रभाग क्रमांक २-ब, प्रभाग क्रमांक ३-ब, प्रभाग क्रमांक ४-ब, प्रभाग क्रमांत ५-ब, प्रभाग क्रमांक -ब, प्रभाग क्रमांक १०-ब, प्रभाग क्रमांक ११- अ, प्रभाग क्रमांक १४-ब, प्रभाग क्रमांक १५-अ, प्रभाग क्रमांक १७ ब, प्रभाग क्रमांक २० -ब तर प्रभाग क्रमांक १-अ, प्रभाग क्रमांक ६-ब, प्रभाग क्रमांक ७-ब, प्रभाग क्रमांक ९-ब, प्रभाग क्रमांक१२ -ब, प्रभाग क्रमांक१३-ब, प्रभाग क्रमांक१६-ब, प्रभाग क्रमांक१८-ब, प्रभाग क्रमांक १९-क या जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत.

खुलाप्रवर्ग महिला : खुल्याप्रवर्गातील महिलांसाठी प्रभाग क्रमांक १-ब क, प्रभाग क्रमांक २- क, प्रभाग क्रमांक ३-क, प्रभाग क्रमांक ४-क, प्रभाग क्रमांक ५-क, प्रभाग क्रमांक ६-क, प्रभाग क्रमांक ७-क, प्रभाग क्रमांक ८-क, प्रभाग क्रमांक ९-क, प्रभाग क्रमांक १० -क, प्रभाग क्रमांक ११-ब, प्रभाग क्रमांक १२-क, प्रभाग क्रमांक १३-क, प्रभाग क्रमांक १४-क, प्रभाग क्रमांक १५-ब, प्रभाग क्रमांक १६-क, प्रभाग क्रमांक १७-क, प्रभाग क्रमांक१८ -क, प्रभाग क्रमांक १९-ड, प्रभाग क्रमांक २० या जागा राखीव आहेत.

खुलाप्रवर्ग : खुलाप्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक १-ड, प्रभाग क्रमांक २-ड, प्रभाग क्रमांक ३-ड, प्रभाग क्रमांक ४-ड, प्रभाग क्रमांक ५-ड, प्रभाग क्रमांक ६-ड, प्रभाग क्रमांक ७-ड, प्रभाग क्रमांक ८-ड, प्रभाग क्रमांक ९-ड, प्रभाग क्रमांक १०-ड, प्रभाग क्रमांक ११-क आणि ड, प्रभाग क्रमांक १२-ड, प्रभाग क्रमांक १३-ड, प्रभाग क्रमांक १४-ड, प्रभाग क्रमांक १५- आणि ड, प्रभाग क्रमांक १६-ड, प्रभाग क्रमांक १७-ड, प्रभाग क्रमांक १८-ड, प्रभाग क्रमांक २० ड.

सर्वाधिक लोकसंख्या प्रभाग क्रमांक ची
महानगरपालिका प्रभाग रचनेमध्ये लोकसंख्येचे प्रमाण कमीत कमी २४ हजार तर जास्तीत जास्त २९ हजार५०० निश्चित केली होती. जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत सर्वाधिक लोकसंख्या प्रभाग क्रमांक ची असून, या प्रभागात २९ हजार ३२९ नागरिक राहतात, तर सर्वात कमी लोकसंख्या २४ हजार १८३ ही प्रभाग क्रमांक १२ मध्ये आहे. प्रभाग रचनेमध्ये अनेक बदल घडून आले आहेत.

प्रत्येक प्रभागात दोन महिला
एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. त्यापैकी दोन जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. त्याच बरोबर प्रत्येक प्रभागात एक जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, प्रभाग क्रमांक १९ मध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा नाही तर प्रभाग क्रमांक११ आणि १५ या प्रभागात प्रत्येकी दोन जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.
बातम्या आणखी आहेत...