आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात हवालाचे 43 लाख रुपये पकडले, सर्व नोटा नवीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - आॅटोतून ४३ लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्यास सिव्हिल लाइन पोलिसांनी पाठलाग करून मंगळवारी रात्री नऊ वाजता पकडले. ही रक्कम नवीन नोटांची असून ती हवालाची असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 
 
रणपिसे नगरातील आपल्या घरातून संतोष कन्ह्यालाल राठी (४२) हा आटो क्र. एमएच ३० पी ९७०३ ने रेल्वे स्थानाकाकडे जात होता. त्याच्याकडे हवालाची ४३ लाख रोकड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आटोचा पाठलाग केला. आटोमधील संतोष राठी कडुन पोलिसांनी रोकड जप्त करून आटोही जप्त केला आहे. सध्या आटोचालक, राठी हा पोलिसांच्या ताब्यात आहे. ४३ लाखांमध्ये दोन हजार आणि ५०० च्या नवीन करकरीत नोटा आहेत. रक्कम मोजण्यासाठी पोलिसांनी मशीन बोलावली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात हरिश्चंद्र दाते, शिवा बावसकर, सचिन दांदळे, गजानन बांगर, उकार्डा जाधव यांनी केली. दरम्यान यामध्ये पोलिसांनी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल केला नव्हता. 
 
शेगावला घेऊन जात होता रक्कम : संतोषराठी याच्या म्हणण्यानुसार ताे शेगावला प्रॉपर्टी घेण्यासाठी जात होता. त्याचा कुकर, गॅस शेगडीचा व्यवसाय आहे, असे त्याचे म्हणणे अाहे. 
बातम्या आणखी आहेत...