आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दिवसाची मुलगी आढळली नाल्यातील झुडपात, बुलडाण्‍यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोताळा - मोताळाते बुलडाणा मार्गावरील खडकी फाट्यापासून जवळच एका नाल्यात पळसाच्या झुडपात एक पाच ते सहा दिवसांची चिमुरडी मुलगी 5 डिसेंबर रोजी आढळून आल्याने खळबळ उडाली. बुलडाणा मार्गावर खडकी फाटा असून फाट्यापासून काही अंतरावर आत खडकी हे गाव आहे. खडकी फाट्यावरून गावाकडे पायी जाणाऱ्या काही नागरिकांना काल डिसेंबरच्या सायंकाळी नाल्यामधून एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. काही नागरिकांनी पाहणी केली असता नाल्यातील पळसाच्या झाडात प्लास्टीकच्या पिशवीत आणि कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत पाच ते सहा दिवसांची गोंडस मुलगी आढळून आली. नागरिकांनी ही बाब तातडीने बोराखेडी पोलिसांना सांगितली.
बातम्या आणखी आहेत...