आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला : शुल्‍क न भरल्याने शेतकऱ्यांच्या 50 मुलांना वर्गातून हाकलले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्गातून हाकलल्‍यानंतर मुलांना रडू कोसळले. - Divya Marathi
वर्गातून हाकलल्‍यानंतर मुलांना रडू कोसळले.
बोरगाव मंजू (जि. अकोला) - विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना शुल्कमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र सरकारचे हे आदेश धाब्यावर बसवत अकोला जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेने प्रथम सत्राचे शुल्क न भरलेल्या अकरावी-बारावीच्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांना बुधवारी वर्गाबाहेर काढले. त्यामुळे हे विद्यार्थी प्रथम सत्र परीक्षेपासून वंचित राहिले. बोरगाव मंजू येथील श्रीमती लीलाबाई केशवराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात हा प्रकार घडला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना अक्षरश: रडू कोसळले. दरम्यान, संबंधित संस्थेवर कारवाईचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

राज्यातील सुमारे २१ जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचे सावट आहे. यात विदर्भ व मराठवाड्यातील बहूतांश जिल्ह्यांचा समावेश आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, यातूनच आत्महत्यांसारखे टोकाचे निर्णयही घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याबरोबरच दुष्काळाग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
बोरगाव मंजू येथील कायम विनाअनुदानित श्रीमती लीलाबाई केशवराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात मात्र विद्यार्थ्यांकडून सर्रास शुल्क वसूली केली जात आहे. अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यांकडून दोन हजार, पाच हजार, सहा हजार रुपये शुल्काची आकारणी केल्याचे सांगितले जाते. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने सुमारे ५० हून अधिक शेतकऱ्यांच्या मुलांनी अद्याप शुल्क भरलेले नाही. बुधवारी या विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा सुरु होती. मात्र शुल्क न भरल्याच्या कारणावरून शुभम गवळी, भावेश विल्हेकर, शुभम इंगळे, तुषार जामनिक, किरण गवळी, प्रतीक्षा चौधरी, रेणुका उमाळे, प्रेमराज गवई, पुष्पा नवलकार, आरती उमाळे यांच्यासह ५० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वर्गाबाहेर काढत परीक्षेपासून वंचित ठेवले.
उपासमारीची वेळ
‘दुष्काळामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही फी भरू शकत नाही,’अशी कैफियत शुभम इंगळे, किरण गवळी यांनी मांडली. काही पालकांनी शाळेत धाव घेतली. ‘मुलांना वर्गाबाहेर काढून अपमानित करू नका,’ अशी विनवणी केली. मात्र शिक्षक व प्राचार्यांनी त्यांना दाद दिली नाही.
अध्यक्षांनी भरला दम
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नाजूकराव गमे यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी व्यथा मांडली. एका मुलीने तर रडत रडत बिकट आर्थिक परिस्थितीचे दु:ख मांडले. मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असलेल्या अध्यक्षांनी ‘सोमवारपर्यंत फी जमा करा, अन्यथा वर्गात बसू देणार नाही’ असा दमच भरला.
पुढील स्‍लाइडवर वाचा, अधिकारी काय म्‍हणतात.....