आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिह्यातील पंधरा रस्त्यांसाठी अाणखी 63 काेटींचा निधी मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - बाळापूर,पातूर, अकाेला, अाकाेट बार्शीटाकाळी तालुक्यातील १५ रस्त्यांसाठी ६३ काेटी लाख रुपये मंजूर करण्यात अाले. यापूर्वी पातुर तालुक्यातील महत्वाच्या चार रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक याेजनेअंर्तगत ३४ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला हाेता. या दाेन्ही निर्णयामुळे ग्रामीण भागात दळणवळणाच्या सोयी सोबत शेतमाल बाजारपेठेमध्ये शीघ्र गतीने अाणणे सहज शक्य हाेणार अाहे

जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे रुग्ण वृद्धांचे प्रचंड हाल होतात. रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी कसरत करावी लागते. रस्त्यांची दुरुस्ती नियमित देखभाल होण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदने दिली. आंदोलनेही झाली. मात्र, तरीही रस्ते देखभाल, दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. यंदा गत तीन वर्षांच्या तुलनेने दमदार पाऊस झाला. परिणामी रस्त्यांची दुरावस्था झाली अाहे. दरम्यान, जिल्हयातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक याेजनेअंतर्गत निधी मिळण्यासाठी लाेकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा केला. त्याला यश अाले असून, शासनाने शुक्रवारी १५ रस्त्यांसाठी निधी मंजूर केला.

या कामांना मिळाली मंजुरी : शासनानेिजल्हयातील १५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली अाहे. यामध्ये बाळापूर तालुक्यातील राज्य मार्ग क्रमांक २७३ ते दगडखेड (३.६५ कि.मी.), राज्य मार्ग क्रमांक २७९ ते बटवाडी बु. (३.५० कि.मी.), राज्य मार्ग क्रमांक २७९ ते खामखेड रस्ता (१.३० कि.मी.) राज्य मार्ग क्रमांक २७९ ते हिंगणा (शेळद) (३.२० कि.मी.), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ते सातरगाव रस्ता (३.२० कि.मी.), राज्य मार्ग क्रमांक २८४ दादुलगाव ते भंडारज बु. (९ कि.मी.), राज्य मार्ग क्रमांक २८१ ते चांगेफळ भाग (११.५० कि.मी.), वाडेगाव राज्य मार्ग क्रमांक २८१ ते देऊळगाव रस्ता (८ कि.मी.), बेलखेड ते अकाेली तालुका हद्द रस्ता (१६ कि.मी.), राज्य मार्ग क्रमांक २४ वाई ते वडाळी देशमुख (६ कि.मी.), एमअारएल ०१ ते राणेगाव रस्ता (१.२० कि.मी.), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ ते दाेनवाडा रस्ता (१०.५० कि.मी.), राज्य मार्ग क्रमांक २८४ ते पांढुर्णा रस्ता (५.६५ कि.मी.), राज्य मार्ग क्रमांक २८४ ते जवळा पाेटे (१२.७५ कि.मी.) आणि कि.मी. अंतराच्या मांडाेली ते मुंगसाजीनगर आदी रस्त्यांचा समावेश अाहे.
बातम्या आणखी आहेत...