आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळमध्ये आश्रमशाळेतून बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला/नागपूर/यवतमाळ-  यवतमाळ जिल्ह्यातल्या ढाणकी गावामध्ये आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका 7 वर्षीय विद्यार्थ्याचा खून झाल्याचे समोर आले आहे. संदीप शेळके असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. संदीप हा आदिवासी निवासी आश्रमशाळेमध्ये पहिल्या वर्गात शिकत होता.
 
कालपासून तो आश्रमशाळेतून बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरु होता. मात्र, आज सकाळी त्याचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने आश्रमशाळेच्या कारभाराविरोधात गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे, दरम्यान, या खूनामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे. 
बातम्या आणखी आहेत...