आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाण्‍ाा: 709 तरुणांना मिळाला ‘कौशल्या’तून रोजगार, संगणक प्रशिक्षणात 330 तरुणांना रोजगार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - राज्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियान आणि नागरी जीवन्नोनती अभियान राबविल्या जात आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात ७०९ तरूण कौशल्य विकास साधत रोजगाराला लागले आहेत.तर विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून हजार ६२४ तरूण प्रशिक्षण घेत आहे. यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियानांतर्गत दोन हजार १३९ तरुणांना आणि राष्ट्रीय नागरी जीवनोन्नती अभियानांतर्गत ४२५ तरूणांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले.
यामध्ये गारमेंट्स, ऑटोमोबाईल्स, ब्युटी पार्लर, बांधकाम, इलेक्ट्रिकल, वेल्डिंग, आदरातिथ्य, संगणक टर्नींग व्यवसायांचा समावेश आहे. सदर प्रशिक्षण जवळपास ५४ बॅचेसमध्ये सुरू आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सुशिक्षीत बेरोजगार तरूणाला प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रमाणपत्रावर तरूणांना रोजगार मिळण्यास किंवा स्वत: व्यवसाय थाटण्यामध्ये सहजता मिळते.

 

जिल्हाभरात योजना सुरू झाल्यापासून ७०९ सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना रोजगार मिळाला आहे. या तरुणांनी जिल्ह्यात २४ बॅचेसमधून प्रशिक्षण पूर्ण केले. व्यवसायानुसार इलेक्ट्रिक व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण करणारे २०५ तरूण असून, बांधकाम व्यवसाया प्रशिक्षित होणारे ५४ तरूण आहेत. राष्ट्रीय नागरी जीवन्नोनती अभियानाद्वारे प्रशिक्षण पूर्ण करून रोजगार मिळविणारे ३० तरूण आहे. तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियानानुसार ६७९ तरूणांच्या हाताला काम मिळाले आहे. कौशल्य विकास हा विभागाचे राज्य शासनाने स्वतंत्र बनविला आहे. या विभागाच्या माध्यमातून केवळ तरूणांचे कौशल्यवर्धन करण्यात येत नाही, तर त्यांना रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगारही मिळवून दिला जात आहे.

 

जिल्ह्यातही विविध रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील कंपन्यामध्ये विविध पदांवर नोकरी देण्यात आली आहे. आदरातिथ्यसारख्या व्यवसायात प्रशिक्षित होवून हॉटेलिंग करण्यामध्ये तरुणांचा कल वाढला आहे. विविध व्हीटीपीच्या माध्यमातून हे कार्य जिल्ह्यात होत आहे. कौशल्य विकास साधत सुशिक्षीत तरुणांचा कल स्वयंरोजगाराकडे वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...