आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची ७४ टक्के पेरणी आटोपली, पाच लाख ७८ हजार ७७३ हेक्टर क्षेत्रावर झाली पेरणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जूनमहिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागात दमदार, तर काही भागात पावसाने तुरळक स्वरूपात हजेरी लावली. या पावसाच्या भरवशावर आजपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाच लाख ७८ हजार ७७३ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली. त्यामध्ये लाख २२ हजार ७४४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर लाख २९ हजार १९८ हेक्टर क्षेत्रावर कापूस तर उर्वरित क्षेत्रावर इतर बियाणाची पेरणी केली असून त्याची टक्केवारी ७४ एवढी आहे. दरम्यान, १० जुलै रोजी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे येत्या काही दिवसांतच उर्वरित रखडलेल्या पेरण्या पूर्ण करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात खरीप पेरणीचे सरासरी हेक्टर क्षेत्र सात लाख ८४ हजार २२२ एवढे आहे. दरम्यान, जून महिन्याच्या १० तारखेपर्यंत मान्सूनचा पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. परंतु हा अंदाज चुकीचा ठरवून पावसाने १९ जुलै रोजी सुरुवात करून दिली. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी शेतीची मशागत केली. परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. दरम्यान जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागात दमदार, तर काही भागात तुरळक स्वरूपात पावसाला सुरुवात झाली. या पावसाच्या भरवशावर आजपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाच लाख ७८ हजार ७७३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. त्यामध्ये सर्वाधिक लाख २२ हजार ७४४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर लाख २९ हजार १९८ हेक्टर क्षेत्रावर कापूस उर्वरित क्षेत्रावर इतर बियाण्यांची पेरणी केली असून त्याची टक्केवारी ७४ एवढी आहे.

वास्तविक पाहता जून महिन्यातील पावसाच्या भरवशावर अनेक शेतकरी मूग आणि उडदाची पेरणी करतात. परंतु पाऊस पडण्यास विलंब झाल्यामुळे पेरणीचा हंगाम निघून गेल्याने मूग उडदाच्या पेरणीत घट झाली आहे. त्यातच मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु आज जिल्ह्याच्या सर्वदूर भागात पावसाने दमदार सुरुवात केल्याने उर्वरित खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे.

तीन लाख २२ हजार हेक्टरवर सोयाबीन
यंदा तीन लाख २२ हजार ७४४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची, तर त्या खालोखाल लाख २९ हजार १९८ हेक्टर क्षेत्रावर कापूस, तूर ६५ हजार ८९३, मूग १७ हजार ५३१, उडीद १५ हजार २१३, मका १६ हजार ३०९, खरीप ज्वारी हजार ४२६ यासह इतर बियाण्यांची पेरणी करण्यात आली.

पावसाच्या विलंबाने मूग, उडदाला फटका
जूनला पाऊस झाल्यास अनेक शेतकरी मूग उडदाची पेरणी करतात. परंतु यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली. त्यामुळे यंदा मूग उडदाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी अन्य पिके घेण्यास पसंती दर्शवली आहे.

तालुकानिहाय पेरणी हेक्टरमध्ये
जळगाव जामोद ३२,३०९
संग्रामपूर ३१, ७६०
चिखली ८०, ५७३,
बुलडाणा ४३, ८५६,
देऊळगावराजा ४१,७६१
मेहकर ७३, ९६८
सिंदखेडराजा ४७, ६९५
लोणार ४३, ८१४
खामगाव ७१, ३४०
शेगाव १०,१७२
मलकापूर ३४,४४३
मोताळा ४३, १६३
नांदुरा २३, ९१९
बातम्या आणखी आहेत...