आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

7 महिन्यांमध्ये 86 आरोपी फरार! 3 वर्षांत साडे तीनशे आरोपींनी दिल्या पोलिसांच्या हातावर ‘तुरी’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर करणे क्रमप्राप्त असताना जिल्ह्यात फरार आरोपींची संख्या वाढत आहे. अशा आरोपींना पकडण्यात पोलिस अपयशी ठरल्याचे दिसत आहे. मार्च ते सप्टेंबर २०१७ या सात महिन्यांच्या काळात विविध गुन्ह्यातील ८६ आरोपी पोलिस रेकॉर्डनुसार फरार आहेत. तर तीन वर्षातील फरार आरोपींचा आकडा ३५० वर पोहोचला आहे. 

आरोपींवर वेळीच कारवाई झाली तर समाजासाठी ते नेहमीच चांगले असते. मात्र एखादा गुन्हा केल्यानंतर आरोपी उजळ माथ्याने फिरत असेल तर नागरिकांचा कायद्यावरील विश्वास कमी होतो आरोपींचे मनोबल वाढते. अकोला पोलिस संकेतस्थळावरच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात फरार आरोपींची संख्या धक्कादायक आहे. मार्च २०१७ ते सप्टेंबर २०१७ दरम्यान विविध पोलिस ठाणेनिहाय फरार आरोपींची संख्या ही ८६ आहे. यात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अशा अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश आले आहे. त्यात सिटी कोतवाली पोलिस ठाण्यातील फरार आरोपींचा आकडा सर्वाधिक असल्याचे दिसून येते. त्याखालोखाल सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील फरार आरोपींची संख्या ११ आहे. तर रामदासपेठ, अकोटफैल शहरातील इतर पोलिस ठाण्यातील फरार आरोपींचा आकडा नगण्य आहे. फरार आरोपी समाजासाठी घातक असल्याने त्यांच्यावर वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे. याकडे पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

चोरीच्या आरोपींची संख्या सर्वाधिक
चोरीच्याघटनेतील फरार आरोपींची संख्या सर्वाधिक आहे. कलम ३८०(चोरी), ३२४ (हाणामारी), ४२० (फसवणूक), ४९८ (महिलांचा शारिरिक मानसिक छळ), ३०४ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३०७ (प्राणघातक हल्ला), अशी गुन्हे करणारे आरोपी फरार यादीत सर्वाधिक आहेत. 

पोलिसांकडून ४०९ आरोपींचा शोध सुरू 
पोलिस रेकॉर्डनुसार आतापर्यंत पोलिसांना ४०९ आरोपी हवे आहेत. त्याचा शोध सतत सुरु आहे. मात्र हे आरोपी पोलिसांच्या हाती आले नाहीत.  
बातम्या आणखी आहेत...