आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाण्‍यात 950 नवदुर्गा मंडळे, शेकडो गावामध्ये एक गाव एक दुर्गा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - दुर्गा, महिषासुर मर्दिनी, रणचंडिका, कालिंका माता, अंबिका, सप्तशृंगी, जगदंबा, रेणुका अशा विविध नामारुपाने ओळखल्या जाणाऱ्या दुर्गा देवीची २१ सप्टेंबर रोजी जवळपास जिल्ह्यातील साडे नऊशेच्यावर दुर्गा उत्सव मंडळांमध्ये घटस्थापना करण्यात येणार आहे. तर शेकडो गावात एक गाव एक दुर्गा बसविण्यात येणार आहे. दरम्यान अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. 
 
मागील आठ दिवसापासून जिल्ह्यातील दुर्गा उत्सव मंडळे मंडप, आरास, मंडपा समोर लाइटींग करण्यात गुंतले होते. नवदुर्गा उत्सवाची जय्यत तयारी पूर्णत्वास आली आहे. दरम्यान २१ सप्टेंबर पासून या उत्सवाला मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात होणार आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्रत्येक शहरात तर बुलडाण्याच्या आठवडी बाजारात दुर्गा देवीच्या विविध आकार रुपाच्या मुर्त्या विक्रीसाठी येत आहेत. त्यातच यंदाच्या वर्षी विविध ठिकाणी दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने जनजागृतीपर देखावे सादर केले जाणार आहे. तर विविध सामाजिक उपक्रम राबवून नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विविध मंडळाकडून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यातील साडेनऊशेच्या वर दुर्गा उत्सव मंडळांनी मोठ्या भक्तीने दुर्गा देवीची स्थापना करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तंटामुक्त अभियानाचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील २५० हून अधिक गावात एक गाव एक देवीची स्थापना करण्यात येणार आहे. 
 
जिल्ह्यात ९५६ ठिकाणी होणार दुर्गादेवीची स्थापना 
जिल्ह्यात ९५६ ठिकाणी दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गादेवीची स्थापना होणार आहे. यामध्ये जळगाव जामोद ७५, मलकापूर ७३, नांदुरा ७०, शेगाव शहर ५७, तामगाव ५०, बुलडाणा ४८, जलंब ४६, मेहकर ३८, जानेफळ २९, साखरखेर्डा २८, मलकापूर ग्रामीण डोणगाव प्रत्येकी २६ अमडापूर, खामगाव ग्रामीण चिखली प्रत्येकी २५ बाेराखेडी पोलिस ठाण्यांतंर्गत २४ मंडळांत देवीची स्थापना होईल. 
 
परवानगी प्रक्रियेमध्ये ऑनलाईनचा खोडा 
सार्वजनिक दुर्गादेवी उत्सव मंडळांकरीता परवाना देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. त्याकरता संकेतस्थळ देण्यात आले असून या संकेतस्थळावर अर्ज सादर केल्यावर उत्सवाकरिता परवाना मिळत आहे. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना अर्ज भरणे झाल्यानंतर फाईल डाऊनलोड करुन प्रिंट निघत नसल्याने मंडळांना अडचणींचा सामना करावा लागतो. 
 
खामगाव परिसरात २४१ दुर्गा मंडळे 
खामगाव उपविभागात पोलिस स्टेशन अंतर्गत २४१ सार्वजनिक मंडळांच्या वतीने नवदुर्गेची स्थापना करण्यात येत आहे. यात खामगाव शहर १०, शिवाजी नगर २४, खामगाव ग्रामीण २५, जलंब ४६, हिवरखेड २५, पिं. राजा १२, शेगाव शहर ६८ शेगाव ग्रामीण ३१ मंडळे आहेत. 
बातम्या आणखी आहेत...