Home | Maharashtra | Vidarva | Akola | 32-year-old youth commits suicide in buldhana

गळफास घेऊन ३२ वर्षीय युवकाची आत्महत्या; खंडाळा येथील घटना, कारण मात्र अस्पष्ट

प्रतिनिधी | Update - Aug 01, 2018, 12:54 PM IST

खंडाळा येथील एका ३२ वर्षीय युवकाने साेमवारी रात्री उशीरा घराजवळील गोठ्यात गळफास घेवून आत्महत्या केली. कर्ज बाजारीपणामुळे

  • 32-year-old youth commits suicide in buldhana

    मेहकर- खंडाळा येथील एका ३२ वर्षीय युवकाने साेमवारी रात्री उशीरा घराजवळील गोठ्यात गळफास घेवून आत्महत्या केली. कर्ज बाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असून नातेवाईक मात्र मराठा आरक्षणाचे कारण सांगत आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.


    संतोष आत्माराम मानघाले याने गोठ्यात रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी तो लवकर दूध घेऊन घरी न आल्यामुळे त्याचे वडील त्यास पाहण्यासाठी गोठ्यावर गेले असता त्यांना संतोषने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. संतोषच्या वडिलांच्या नावावर स्टेट बँकेचे १७ हजार ५८१ कर्ज होते. हे कर्ज माफ झाले नव्हते. संतोष मानघाले याचा मृतदेह विच्छेदनासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात आणला असता त्याच्या नातेवाइकांनी ही आत्महत्या मराठा आरक्षणासाठी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शवविच्छेदन झाल्यावर देखील चार तास मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला नाही. शेवटी तहसीलदार काकडे यांनी जमावाची समजूत काढत शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस प्रशासनाच्या वतीने खंडाळा गावात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मृतकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.


    यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रा. विनोद पऱ्हाड, जिल्हा परिषद सदस्य आशिष रहाटे, नीरज रायमूलकर, गजानन गारोळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष देवानंद पवार, गिरीधर ठाकरे, मनसेचे लक्ष्मण जाधव, पंचायत समिती उपसभापती राजू घनवट, खंडाळा सरपंच रतन मानघाले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Trending