आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या करण्यापूर्वी युवकाने लिहिली ३४ पानांची सुसाइड नोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पूर्ववैमनस्यातून प्रेयसीच्या आईने प्रियकराविरुद्ध मुलीला तक्रार द्यायला भाग पाडले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आपल्यावर खोटी कारवाई केली आणि फसवले म्हणून युवक तणावात होता. त्या परिस्थितीत त्याने ३४ पानांची सुसाइड नोट लिहिली आणि विष प्राशन करून आत्महत्या केली. मृतक युवकाचे वडील मंगळवारी खदान पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी खदान पोलिसांना ३४ पानांची सुसाइड नोट दिली आहे. वैभव उर्फ सोनू वीर (वय २२ रा. खडकी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 


२१ मार्च रोजी वैभवविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात छेडछाड केल्याची तक्रार अल्पवयीन मुलीने दिली होती. त्यावरून पोलिसांनी युवकाविरुद्ध भादंवि ३५४ व पोस्को नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून युवक घाबरला होता आता पोलिस आपल्याला पकडतील असे म्हणून तो दहशतीत होता. तेव्हापासून तो सतत ताण तणावाखाली होता. दरम्यान ९ मे रोजी विष प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी खदान पोलिसांनी युवकाच्या वडिलांचे बयाण घेतले. 


या बयाणामध्ये आपल्या मुलाचे आणि मुलीचे प्रेमसंबंध होते म्हणून मुलीच्या आईने मुलीला जबरदस्ती तक्रार द्यायला भाग पाडल्याचे म्हटले आहे. त्यानंतर युवकाने लिहिलेली ३४ पानांची सुसाइड नोट घरात सापडली. त्यात मुलीच्या आईचे आणि एका युवकाचे संबंध असल्याचे माहित झाल्यानेच आपल्याला दबावात आणण्याचा प्रयत्न झाला व मुलीला ढाल बनवून तिच्या आईने विनयभंगाची तक्रार द्यायला लावल्याचे म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...