आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्ण घेऊन जाताना रुग्णवाहिका रस्त्यात पडली बंद, आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संग्रामपूर - विषारी औषध प्राशन केलेल्या एका शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला वरवट बकाल येथून पुढील उपचारासाठी शेगाव येथे रुग्ण वाहिकेव्दारा हलवण्यात आले होते. परंतु आठ किलोमीटर जात नाही तोच, ही रुग्ण वाहिका अचानक बंद पडली. त्यामुळे जवळपास अर्धा तास रुग्ण तडफडत होता. अखेर चालकाने तत्परता दाखवून खासगी वाहनाने रुग्णाला शेगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. ही घटना २१ डिसेंबर रोजी संध्याकाळी पातुर्डा फाट्याजवळ घडली.

 

या रुग्ण वाहिकेत ऑक्सीजनसह अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या रुग्ण वाहिकेमुळे आतापर्यंत अनेक रुग्णांचे जीव वाचले आहेत. परंतु मागील काही दिवसापासून वानखेड प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्ण वाहिका भंगार झाली आहे. परंतु या रुग्ण वाहिकेकडे वरिष्ठ अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णाचे जीव धोक्यात सापडले आहेत. २१ डिसेंबर रोजी वानखेड येथील मोहन श्रीराम रौंदळे या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. हागे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना शेगाव येथे हलवण्याचे सांगितले. त्यानंतर वानखेड प्राथमिक आरोग्य केंद्राची एम.एच. २८/ एच/ ५१०९ या क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावण्यात आली. रुग्णासह शेगाव येत जात असतानाच अचानक रुग्ण वाहिका पातुर्डा फाट्याजवळ बंद पडली. जवळपास अर्धा तास चालक विठ्ठल आखुड यांनी वाहनाच्या दुरुस्तीसाठी शर्थीचे प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...