आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात महावितरणमधील एटीपी मशीन फाेडून 5.60 लाख लुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - येथील महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयातील एटीपी मशीन (ऑल टाइम पेमेंट) फोडून चोरट्यांनी लाख ६० हजार रुपये लुटल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला चाकूने हल्ला करून जखमी केले.

 

लूटमारीची घटना दुर्गा चाैकातील महावितरणच्या कार्यालयात घडली. लुटारूंनी सुरक्षा रक्षक सुधीर मधुकर लाळे यांच्यावर प्रथम हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानंतर लुटारूंनी अापला माेर्चा एटीपी मशीनकडे वळवला. अाराेपींनी लाख ६० हजार रुपये पळवले. लुटमारप्रकरणी रामदास पेठ पोलिस ठाण्यात अाराेपींविरुद्ध भादंविचे कलम ३९४, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात अाला. याप्रकरणी पोलिसांनी संताेष राजराम भटकर (वय ३२), वसंत नारायण महाजन काले खान महेमूद खान यांना अटक केली अाहे. या अाराेपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अाराेपींची २७ डिसेंबरपर्यंत पोलिस काेठडीत रवानगी करण्याचा अादेश दिला.

बातम्या आणखी आहेत...