आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती ST महिला वाहकावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला; कोणालाही अटक नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला/नागपूर- अमरावती येथे ST च्या महिला वाहकावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र महिला वाहकाचा सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

 

 

आपल्या आईशी वाद घातल्यामुळे मुलाने या महिला वाहकावर हल्ला केला. यात गावंडे या महिला वाहक गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तिकीट घेण्यावरून एका प्रवासी महिलेने या महिला वाहकाशी वाद घातला. अमरावती- माहुली रोड दरम्यान आज दुपारी साडेबाराच्या दरम्यानची ही घटना घडली. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

 


वाद घालणाऱ्या महिलेने गाव जवळ येताच मुलाला फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर त्या मुलाने काहीही न ऐकता तीक्ष्ण हत्याराने महिला वाहकावर हल्ला केला. हल्ला करणाऱ्या टोळक्यामध्ये चार ते पाच जणांचा समावेश होता. 
 

बातम्या आणखी आहेत...