आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणारा शाखाधिकारी, शिपाई निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- पीक कर्जाच्या बदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँकेचा  शाखाधिकारी राजेश हिवसे व त्याची साथ देणारा शिपाई मनोज चव्हाण यांना अकोला सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक नरेंद्र मलालीकर यांनी निलंबित केले.   

 
मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँकेत शेतकरी त्याच्या पत्नीसह पीक कर्जाच्या मागणीसाठी गेला असता येथील शाखाधिकारी राजेश हिवसे याने शेतकऱ्याच्या पत्नीस शरीरसुखाची मागणी केली होती. यासंदर्भात पीडित महिलेने मोबाइलवरील त्याचे संभाषण रेकॉर्ड करून मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे व त्याला साथ देणारा शिपाई मनोज चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. यातील शिपाई मनोज चव्हाण यास पोलिसांनी अटक केली. तर शाखाधिकारी हिवसे अजूनही फरार आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक यांनी दोघांनाही निलंबित केले. या प्रकरणात लवकरच दोघांची विभागीय चौकशी होणार आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला बँकेचा शिपाई मनोज चव्हाण याचे हृदयाचे ठोके वाढल्याने त्याला मलकापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...