आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनी अनोख्या पद्धतीने साजरा केला जन्मदात्याचा वाढदिवस; असे केले सेलिब्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलढाणा- शेगाव येथील दोन तरुणींनी आपल्या वडिलांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.अपर्णा आणि अंकिताने रक्तदान करून वडिलांना अनमोल गिफ्ट दिले आहे.

 

शेगाव येथील रहिवासी अजय अहिरे यांचा नुकताच वाढदिवस झाला. वायफळ खर्च न करता अहिरे यांच्या वाढदिवशी दोन्ही मुलींनी रक्तदान करून समाजात नवा पायंडा पाडला.

 

'बेटी बचाओ बेटी पढओ' या अभियानांर्गत ती मुलींना शिक्षण आणि त्यांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे अपर्णा हिने सांगितले. मुलींनी कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे  यासाठी वडिलांचे प्रोत्साहन अधिक बळ देत असते. वडिलांच्या प्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी रक्तदान करण्‍याचा संकल्प केल्याचेही तिने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...