आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाबीज संचालक पद निवडणूक: धाेत्रे यांचा विजय, पण मताधिक्य घटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- महाराष्ट्र बियाणे महामंडळ (महाबीज) विदर्भ मतदारसंघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात अाला. या निवडणुकीत भाजप खासदार संजय धाेत्रे विजयी झाले. धाेत्रेंना ९ हजार ४०६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांना ३ हजार ९८३ मते मिळाली. खा. धाेत्रे हे पाचव्यांदा विजयी झाले. उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव देशमुख हे अविरोध निवडून अाले. 


महाबीजचे दाेन मतदार संघ विदर्भात येतात. पहिल्या मतदारसंघात अकाेला, अमरावती, यवतमाळ,वाशीम, वर्धा, नागपूर भंडारा व बुलडाणा जिल्हयातील खामगाव व नांदुरा तालुक्याचा समावेश अाहे. धाेत्रे यांची चौथी टर्म हाेती. महाबीजच्या विदर्भ व उर्वरित महाराष्ट्र संचालकपदासाठी ७ डिसेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली हाेती. १३ जानेवारी राेजी संध्याकाळपर्यंत मतपत्रिका स्वीकारण्यात अाल्या. मतपत्रिकांची छाननी १५ ते १९ जानेवारी या दरम्यान सायंकाळी ६ पर्यंत करण्यात अाली. उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून बुलडाणा जिल्हयातील वल्लभराव देशमुख यांच्या विराेधातील उमेदवारांनी अर्ज मागे घेतले हाेते. त्यामुळे ते एकमेव निवडणूक रिंगणात उरले हाेते. 


अमानत रक्कम वाचली; ३३२ मते ठरली अवैध 
महाबीज संचालक पदाच्या निवडणुकीत एकूण १३ हजार ३८९ मते वैध, तर ३३२ मते अवैध ठरली. संजय धाेत्रे यांना ७०.२५ टक्के, तर प्रशांत गावंडे यांना २९.७५ टक्के मते मिळाली. २५ टक्के किंवा त्या पेक्षा कमी मते मिळाल्यास अमानत रक्कम जप्त हाेते.

बातम्या आणखी आहेत...