आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला- जिल्ह्यात व उपविभागात तीन प्रमुख शाखांचे पथके कार्यरत आहेत. त्यापैकी सर्वाधिक कारवायांचा सपाटा हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने लावल्याचे कारवायांच्या आकडेवारीवरून दिसून येते. या पथकाने २० दिवसांत अवैध धंद्यावर १२ कारवाया करून ४८ आरोपींना पकडले. तर इतर शाखांना कारवायांच्या बाबतीत दुहेरी आकडा गाठता आला नाही.
मोठ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी एलसीबी काम करीत आहे. या शाखेने चारचाकी वाहनांचे रॅकेट उद्ध्वस्त केले व इतरही लक्ष्यवेधी कारवाया केल्या आहेत.जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यांना जरब बसावी व त्यांचे तळ नष्ट व्हावेत, या उद्देशाने विशेष पथकाचे गठण केले. या पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी सर्वाधिक कारवाया करून गुन्हेगारांच्या नाकात दम आणला. या पथकाने ५ जानेवारीपासून आजपर्यंत सर्वाधिक १२ अवैध धंद्यावर छापे टाकले. त्यात त्यांनी ४८ आरोपींना अटक केली. गुरुवारच्या रात्री सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली. त्यात १४ आरोपींना अटक केली. या कारवायांमुळे विशेष पथकाने धंदेवाल्यांना पळता भुई कमी केल्याचे दिसून येतेे. उपविभागीय पोलिस विभागाचे पथक अवैध धंद्यावर कारवायांसाठी चाचपडत असल्याचे दिसते. विशेष पथकाने गौण खनिज माफिया, गुटखा माफिया, अवैध दारूविक्रेतेे, जुगार अड्डे टार्गेट केल्याने अवैध धंदेवाल्यांना काही प्रमाणात का होईना जरब बसली आहे.
विशेष पथकाच्या कारवायांचा तपशील असा
दारू, जुगाराने अनेकांचे संसार झालेत उद्ध्वस्त
ग्रामीण भाग, शहरात मध्यम वर्गीय वस्तीत दारू, जुगाराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत.मात्र अवैध धंदेवाल्यांची माहिती दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, या भीतीने तक्रारी साठी कुणी पुढे येत नाही. मात्र व्यसनापासून कुटुंबीयांना दूर राहण्यासाठी त्यांचा बंदोबस्त आवश्यक असते, त्यासाठी पुढाकार घेत माहिती दिल्यास कारवाईची शाश्वती आहे.
आजूबाजूला सुरु असलेल्या अवैध धंद्याची माहिती द्या!
अवैध धंद्यापासून समाजाला मोठा त्रास असतो. मात्र धंद्याविषयी पोलिसांना कळवल्यास आपणास त्रास होईल, अशी भीती नागरिकांनी मनातून काढावी. माहिती देणाऱ्याच्या नावाचा कुठेही उल्लेख होणार नाही. माहिती दिल्यास कारवाई निश्चित होईल. म्हणून नागरिकांनी निःसंकोचपणे पोलिसांना माहिती द्यावी.
-हर्षराज अळसपुरे, पथक प्रमुख एसपी स्कॉड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.