आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 हजार गरजू लोकांना पुरणपोळी खाऊ घालून साजरी केली होळी, मागील 18 वर्षांपासून उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - होळी दहनाच्या वेळी पूजन करताना नैवेद्य म्हणून पुरणपोळी होळीत टाकण्याची प्रथा आहे. काळानुसार परंपरेत बदल व्हावा. तसेच होळी अन्न जाळण्यापेक्षा ते एखाद्या गरजूला देऊन त्याच्या पोटाची आग शांत करावी, हे जास्त महत्त्वाचे आहे. याच विचाराने मागील १८ वर्षांपूर्वी प्रा. गणेश कावरे यांच्या संकल्पनेतून उपेक्षित, गरजूंना होळीच्या दिवशी पुरणपोळी देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. तेव्हा पासून निरंतर हा उपक्रम सुरू असून, यावर्षी लोकसहभागातून २५ हजार पुरणपोळी जमा झाली. शहरातील २५ हजार गरजू, उपेक्षितांना ही पुरणपोळी देऊन गुरूवारी होळीचा सण साजरा करण्यात आला.

 

नैवेद्य म्हणून होळीत पुरणपोळी टाकण्यापेक्षा एखाद्या गरजू, जे पुरणपोळीचा आस्वाद घेऊ शकत नाही, अशांना ती देऊन त्यांची आणि आपली होळी आनंदात साजरी करता येते. त्यामुळे नैवेद्यासाठी ठेवलेली पुरणपोळी होळीत न टाकता अभिनव सेवा समितीकडे आणून द्यावी, या अावाहनाला प्रतिसाद देत हजारो नागरिकांनी गुरूवारी आपल्याकडील पुरणपोळी आणून दिली. शहरात डाबकी रोड गोळे स्वस्त धान्य दुकान जवळ, रामदास पेठ येथे नाना उजवणे यांच्या घराजवळ, कौलखेड चौक, गोरक्षण रोड येथील देवी प्लाझा जवळ, माळीपुरा, खदान येथे शासकीय गोदाम जवळ तसेच उमरी येथे देखील पोळी संकलन करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच माता नगर भागात झालेल्या अग्नितांडवात होरपळून निघालेल्या नागरिकांना होळी साजरी करणे शक्यच नाही.


हाच विचार करून सेवा समितीने प्रथम तेथील सर्व नागरिकांना पुरणपोळी दिली. त्यानंतर सर्वोपचार रुग्णालय येथील रुग्णांच्या नातेवाईकांना पुरणपोळी देण्यात अाली. शहरातील विविध ठिकाणी २५ हजार पुरणपोळी संकलन झाले. या उपक्रमात प्रा. गणेश कावरे, अॅड. संतोष गोळे, डॉ. अशोक ओळंबे, केशव अंधारे, श्रीकृष्ण माळी, रविंद्र पावसाळे, प्रशांत भुईभार, संजय मराठे, रेणूका जानोरकर, माया भुईभार, विद्या दांदळे, सरला मराठे, सीमा पाठक, बेबीनंदा निचळ, श्यामली अंधारे, वंदना लांडे, निलीमा मोडक, अर्चना गावंडे, वंदना चिंचोळकर, विद्या लांडे, सीमा राजवैद्य, सुनिल अवचार, गजानन भोंगे, मुकूंद राठोड, संदीप ठाकरे, सुरेश राऊत, चंद्रकांत अतकरे, पुरूषोत्तम वैराळे, नारायण उंबरकर, वामनराव चोपडे, विनायक धोरण, विठ्ठल गाडे, नंदू इंगळे, दिनकर घोडेराव, अरुण मानकर यांच्यासह जवळपास २५० ते ३०० युवक, युवती, महिला, पुरूष सहभागी झाले.

 

बातम्या आणखी आहेत...