आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या प्रियकराने घरी नेऊन केले असे काम, अल्पवयिन मुलीने सांगितली आपबीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- वाईट कृत्याला प्रोत्साहन देणाऱ्या अाईसह तिच्या प्रियकराचे पितळ १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने उघड केले. याप्रकरणी आपला त्याच व्यक्तीने विनयभंग केल्याचा जबाब मुलीने पोलिसांना दिला. त्यावरून आईसह त्या व्यक्तीविरुद्ध शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 


शहरातील घाटपुरी नाका परिसरातील १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार १० जून रोजी तिच्या आईने शिवाजीनगर पोलिसांत दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन हकिकत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, मुलीने धक्कादायक बयाण दिले. आईच्या प्रियकराने घरी येऊन आपला विनयभंग केल्यामुळे घरून निघून गेल्याचा जबाब दिल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


खामगाव येथील गोपाळनगरातील मनोज गाडे यांचे संबंध शहरातील घाटपुरी नाका परिसरात राहणाऱ्या एका महिलेशी होते. यामुळे गाडे यांचे तिच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. दरम्यान, ८ जून रोजी मनोज गाडे याने त्या महिलेच्या १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. झालेला प्रकार त्या मुलीने तिच्या आईला सांगितला असता आईने तिच्या पाठीशी उभे न राहता उलट प्रोत्साहन दिले. तसेच जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. या भीतीमुळे मुलगी घरातील कोणत्याही व्यक्तीला काहीही न सांगता घरून निघून गेली. तिचा शोध घेतल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पीडित मुलीची आई व संशयित आरोपी मनोज गाडे या दोघांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय चंद्रकांत बोचरे करीत आहे. 


मुलीने पोलिसांत दिला जबाब 
आपले हे पितळ उघडे पडू नये व मुलगी घरी परतली नाही म्हणून या महिलेनेे खामगाव शिवाजी नगर पोलिस स्टेशन गाठून १० जून रोजी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. या आधारे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्या मुलीचा शोध सुरू केला. तिला शोधून पोलिस स्टेशनमध्ये आणले आणि तिचा जबाब नोंदवला. या जबाबातून पितळ उघडे पडले. 

बातम्या आणखी आहेत...