आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर मातृत्व; गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या युवकाविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युवक वाशिम येथील असून तो अकोल्यात शिक्षण घेण्यासाठी आला आहे. चेतन किशोर लहाने असे आरोपीचे नाव आहे.

 

चेतन हा अकोल्यातील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयात पॉलिटेक्निकचे शिक्षण घेण्यासाठी आला आहे. तो जवाहर नगरमध्ये भाड्याने खोली करून राहत होता. यावेळी त्याची ओळख गीतानगरमध्ये राहणाऱ्या इयत्ता १० वीत शिकत असलेल्या एका मुलीसोबत झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याने मुलीवर ऑक्टोबर २०१६ पासून त्याच्या खोलीवरच सतत बलात्कार केला. त्यातून मुलगी गर्भवती राहिली. मुलीची प्रसूतीची वेळ जवळ आल्याने तिला वेदना झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला मंगळवारी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने एका बाळाला जन्म दिला. कुमारीमाता असल्याने या घटनेची नोंद पोलिसांनी केल्यानंतर जुने शहर पोलिसांकडे प्रकरण पाठवण्यात आले. मुलीचे बयाण घेतल्यानंतर तिच्यावर सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात वाशिम येथील युवकाविरुद्ध बलात्कार लहान मुलांचे लैंगिक शोषण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिव्हिल लाइन्स पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...