आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकाेला- महाराष्ट्र बियाणे महामंडळ (महाबीज) विदर्भ मतदारसंघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत एकीकडे विद्यमान संचालक खा. संजय धाेत्रे यांच्यासाठी भाजप नेत्यांची फळीच मैदानात उतरली हाेती, तर प्रतिस्पर्धी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांच्यासाठी शेतकरी नेत्यांनी 'फिल्डिंग' लावली हाेती. यंदा झालेल्या निवडणुकीत विद्यमान संचालक धाेत्रें यांनी ५ हजार ४२३ मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवारा गावंडेंवर विजयी मिळवला असला तरी धाेत्रेंचे मताधिक्य गत वेळच्या तुलनेने जवळपास ९९४ कमी झाले असून, गावंडेंना मात्र १ हजार ८३ मते जास्त मिळाली अाहेत. त्यामुळे एकूणच निवडणुकीवर नजर टाकल्यास भाजपसाठी ही धाेक्याची घंटा अाहे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे अाहे.
जिल्ह्यात येणाऱ्या काळात येणाऱ्या शेतकरी जागर मंच ठरणार सक्षम पर्याय ठरणार असल्याचे मंचची अलीकडची वाटचाल व महाबीज निवडणुकीवर नजर टाकल्यास दिसून येते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंचने ४ ते ६ डिसेंबर दरम्यान माजी अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना साेबत घेत थेट पोलिस मुख्यालयातच ठिय्या अांदाेलन केले. अांदाेलनाची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांना सोयाबीन बोनसचे ७ कोटी देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मंचच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी निवासस्थानासमोर काळी दिवाळी साजरी केली. या अांदाेलनामुळे संपूर्ण राज्यातील सोयाबीनचे १०८ काेटी रुपये मिळण्याचा मार्ग माेकळा झाला. अमरावती विभागात ७८ काेटी ७४ रुपयांचे तूर खरेदीचे चुकारे थकल्याने शेतकरी जागर मंच व प्रहार जन शक्ती पक्षाने थेट जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात अांदाेलन केले हाेते. या अांदाेलनाची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेत अांदाेलकांशी माेबाईल फाेनवरुन चर्चा केली हाेती. त्यानंतर काही दिवसांनी चुकाऱ्याचे पैसे जमा झाले हाेते. त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन अांदाेलन छेडून शेतकरी जागर मंच सक्षम पर्याय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांचे मत अाहे.
ही तर शेतकरी हिताच्या निर्णयाची पावती: भाजप महानगराध्यक्ष किशाेर मांगटे पाटील
भाजपचे खा. धाेत्रे यांचा विजय हा सरकारकडून घेण्यात येत असलेल्या शेतकरी हिताच्या निर्णयाची पावतीच अाहे. या निवडणुकीत काेणीही काेणावरही दबाव टाकण्याचा टाकला नाही, तशी तक्रारही नव्हती. भागधारकांनी भाजप व खा. धाेत्रेंवर विश्वास टाकला अाहे.
सत्तेचा दबाव : प्रशांत गावंडे, शेतकरी जागर मंच
महाबीजच्या निवडणुकीत भागधारकांची दिलेला काैल मान्यच अाहे. मात्र निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली, असे म्हणता येणार नाही. सत्तेचा दुरुपयोग झाला. भागधारकांवर दबाव हाेता. अनेक ठिकाणी प्रलोभने दाखवली. अाम्ही भागधारक असलेल्या शेतकऱ्यांशी संवादही साधला हाेता.
लढत चांगली दिली: खासदार संजय धाेत्रे, विजयी संचालक
महाबीज संचालक पदाच्या निवडणुकीत प्रशांत गावंडे यांनी चांगली लढत दिली. प्रत्येकाचाच हेतू चांगलाच हाेता. सर्व भागधारक मतदारांचे अाभार नेते-पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यापुढेही शेतकरी हिताचे निर्णय घेऊ.
पोलिस भरती; प्राविण्यप्राप्त खेळाडूंना उपसंचालकांचे प्रमाणपत्र आवश्यक
व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण देण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस भरतीसाठी
उमेदवारांचा वेळेवर गोंधळ होऊ नये, म्हणून अकोला पोलिसांनी खेळाडू उमेदवारांना आवाहन केले आहे, की खेळाडूंनी विभागीय उपसंचालक यांच्याकडून खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी. खेळाडू उमेदवाराने अर्जासोबत विभागीय उपसंचालक यांनी क्रीडा प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गासाठी पात्र ठरतो याबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. पडताळणी केलेल्या क्रीडा प्रमाणपत्राची प्रत पोलिस शिपाई भरतीकरता केलेल्या अर्जासोबत न जोडल्यास छाननीमध्ये खेळाडू संवर्गातून उमेदवाराचा अर्ज विचारात घेतल्या जाणार नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक तथा पोलिस अधीक्षक कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी विलास पाटील यांनी यांनी दिली आहे.
पाच फेब्रुवारी रोजी निघेल पोलिस भरतीची जाहिरात
५ फेब्रुवारी २०१८ रोजी पोलिस भरतीची जाहिरात निघण्याची शक्यता आहे. ही तारीख गृहीत धरून प्राविण्यप्राप्त खेळाडूंना ५ फेब्रुवारीपर्यंत विभागीय क्रीडा उपसंचालकांकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे लागणार आहे.
भारतीय जनता पक्षासाठी धोक्याची घंटा
महाबीज संचालकपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार संजय धोत्रे यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
निवडणूक मतमोजणीच्या वेळी झाला वाद
महाबीज संचालक पदाच्या निवडणुकीची मतमोजणी मुख्य कार्यालयातील सभागृहात पार पडली. खा. संजय धाेत्रे व प्रशांत गावंडे या दाेन्ही उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी सभागृहात हाेते. मात्र मंजूर संख्येपेक्षा जास्त प्रतिनिधी असल्याने दाेन्ही समर्थकांमध्ये वाद झाला. मात्र अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. त्यानंतर दाेन्ही विजयी संचालकांना निर्णय अधिकारी विनय वर्मा यांनी प्रमाणपत्र दिले.
तलवार भेट देऊन केले दोघांचे स्वागत
महाबीज संचालक पदाच्या निवडणुकीत विजयी झालेले खा. संजय धाेत्रे व वल्लभ देशमुख यांना तलवार भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात अाले. निर्णय जाहीर हाेताच महाबीज कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. या वेळी अामदार गोवर्धन शर्मा, अा. रणधीर सावरकर, महापाैर विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष तेजराव थाेरात, सभापती बाळ टाले, गणेश अंधारे, प्रशांत अवचार, सागर शेगाेकार, रणजित खेडकर, नितीन लांडे, संजय लाेणकर, अनुप गाेसावी अादी उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.