Home | Maharashtra | Vidarva | Akola | Nikita is seventh in the country and Vaidehi is 26th In CA Intermediate examination

सीए इंटरमिजिएट परीक्षेत निकीता देशात सातव्या तर वैदेही २६ व्या क्रमांकावर

प्रतिनिधी | Update - Aug 02, 2018, 07:07 AM IST

अकोल्यातील तीन विद्यार्थी ऑल इंडिया मेरिट आले असून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

  • Nikita is seventh in the country and Vaidehi is 26th In CA Intermediate examination

    अकोला- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेत अकोल्यातील तीन विद्यार्थी ऑल इंडिया मेरिट आले असून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.


    आयसीएआयकडून २९ जुलै रोजी रात्री उशीरा जाहीर झालेल्या निकालात राठी करिअर फोरमचे तीन विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकले. यात उमरखेडहून अकोल्यात शिकण्यासाठी आलेली निकिता मोहनकुमार अग्रवाल हिने ८०० पैकी ६३७ गुण प्राप्त करत भारतातून ७ वा क्रमांक पटकावला आहे, तर वैदेही संतोष मालाणी हिने ५९९ गुण घेत २६ वा क्रमांक तसेच संकेत प्रशांत भुतडा यानेसुद्धा ५९९ गुण प्राप्त करत २६ वा क्रमांक पटकावला. याव्यतिरिक्त इतर ७० विद्यार्थ्यांनी सीए इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण करून सीए फायनलमध्ये प्रवेश घेतला.


    गुणवत्ता यादीत आलेल्या निकिता अग्रवालला सर्वाधिक अकाउंट्स या विषयात १०० पैकी ९७ गुण तर ऑडिट या विषयात ८६ गुण मिळाले आहेत, तर वैदेही मालाणी हिला लॉ या विषयात सर्वाधिक ८५ गुण मिळाले आहेत. आरसीएफच्या एकूण ५८ विद्यार्थ्यांनी अकाउंट या विषयात ६० पेक्षा अधिक गुण मिळवले तर अॅडव्हान्स अकाउंटमध्ये ४० विद्यार्थ्यांनी ६० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. या निकालाचे श्रेय नीरज राठी यांनी मार्गदर्शक सीए राम हटकर, केयुर डेडिया, विशाल मालविया, प्रणव चांडक, प्रणीत अग्रवाल, प्रो. महेश मुंदडा यांना दिले आहे. भविष्यात भारतातून पहिल्या तीनमध्ये विद्यार्थ्यांना आणण्याचा मानस या वेळी आरसीएफचे संचालक नीरज राठी यांनी व्यक्त केला.

Trending