आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयशर झाडावर धडकल्यामुळे एक ठार; तीन जण झाले जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर- कारंजा रस्त्यावरील जामठी (खूर्द) जवळ भरधाव आयशर ट्रक रस्त्याच्या कडेच्या निंबाच्या झाडावर धडकल्यामुळे आज, १२ जून रोजी झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर चालकासह तिघे जखमी झाले आहेत. 


१२ जून रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान हिंगणघाटवरून जळगाव जामोदकडे जाणाऱ्या आयशर क्रमांक एमएच २८, एबी ७९५० च्या वाहनचालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेच्या निंबाच्या झाडाला जबर धडक दिली. त्यामुळे आयशरमधील योगेश समाधान राऊत (वय ३२ वर्षे) रा. जळगाव जामोद हा ठार झाला. जळगावचेच आकाश जावरकर (२२), गजानन बावस्कर(५७) व चालक वैभव आढाव जखमी झाले. जखमींना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले असून, गजानन बावस्कर अत्यवस्थ आहेत. येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये वाहन चालक वैभव आढावविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार एपीआय नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात एएसआय गणेश चोपडे करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...