आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाच्या वाढदिवसासाठी ठेवलेल्या रकमेची चोरी; पै-पै करून जमवले होते पैसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मुलाचा पहिलाच वाढदिवस असल्याकारणाने महिलेने पै-पै जमा करून १० हजार रुपये जमवले. ७ मे रोजी मुलाच्या वाढदिवशी ही रक्कम खर्च करू, असे म्हणून ठेवलेली रक्कम चोरट्याने चोरून नेली. पैसेच चोरीला गेल्याने दाम्पत्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शुक्रवारी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


कांता दिनेश इंगळे (वय ३७ वर्ष, धंदा -घरकाम रा. नागसेन नगर, शिवणी) यांचे पती इंगळे हे ट्रकवर चालक आहेत. गेल्यावर्षी इंगळे दाम्पत्यांना एक मुलगा झाला. मुलाचा वाढदिवस ७ मे रोजी असल्याने काही दिवसापासून कांता यांनी १० हजार रुपये जमवले व ते आलमारीतील लॉकरमध्ये ठेवले होते. याच लॉकरमध्ये त्यांनी मुलाच्या जन्मावेळी नातेवाइकांनी दिलेले सात ते आठ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने ठेवले होते. २६ एप्रिल रोजी बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळखुटा येथे नातेवाइकांच्या लग्नासाठी पतीपत्नी गेले होते. २७ एप्रिल रोजी ते सकाळी घरी आले असता त्यांना दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर घरात पाहिले असता गॅस सिलिंडर, गव्हाचे पोत्यासोबतच आलमारीतील १० हजार रुपये व दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. 

बातम्या आणखी आहेत...